लातूर : प्रतिनिधी
काँग्रेस पक्षाच्या सर्वसमावेशक विचारधारेला आणि विकासाभिमुख धोरणांना समर्थन देत भारतीय जनता पक्षाचे पानगाव येथील माजी जिल्हा परिषद सदस्य ईश्वर गुडे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे परिसरातील राजकीय वातावरणात हालचाल निर्माण झाली असून काँग्रेस पक्षाची ताकद वाढली आहे. या प्रवेश प्रसंगी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी सर्व नवप्रवेशित पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे काँग्रेस परिवारात मन:पूर्वक स्वागत केले.
यावेळी श्रीराम हरिदास माजी चेअरमन पानगाव सेवा सहकारी सोसायटी, रामभाऊ हरिदास माजी ग्रामपंचायत सदस्य पानगाव, बाबुराव हरिदास जेष्ठ कार्यकर्ते भाजप, बब्रुवान भंडारे, रामभाऊ फुले, भारत संपते, मुरलीधर डोणे, गुंडेराव तुरूप, गोविंदराव दुडे, पानगाव सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन गणेशराव वांगे, गोपाळराव शेंडगे, पानगावचे माजी शहराध्यक्ष भाजप गणेशराव तुरूप, भागवतराव बनसोडे, किशोर हरिदास, रमाकांत संपते, अॅड. किशोर शिरगिरे,, अॅड. राजकुमार कांबळे, अॅड. माधव गुडे, दिपकराव पेदे, माऊली संपते, आरुप कुलकर्णी, दत्तात्रय भंडारे, सुभाषराव गुडे, अभिमान संपते, रामदास गुडदे, परमेश्वर आरडले, सचिन भंडारे, विजयकुमार जाधव, बलभीम जाधव, नागोराव जाधव, लक्ष्मण जाधव, बिभीषण जाधव, जगदीश संपते, फिरोज पठाण, प्रवीण आचार्य, सुरेंद्र हरिदास, कचरू सुळ, रुक्माजी संपते, अमोल सुरवसे, व्यंकटराव वांगे, सुरेश मुस्रे, रामदास उकरले, संतोष चिताडे, रोहित तुरूप राम गोरे, जनार्दन बघिले, अनिल तरुण सिद्धेश्वर शेंडगे, वैजनाथ कस्पटे, यांच्यासह शेकडो पदाधिकारी नागरिक यांनी काँग्रेस पक्षात माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अभय साळुंके, रेणापूर तालुका काँगे्रसचे अध्यक्ष प्रमोद कापसे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संतोष देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक अनुप शेळके, उमेश बेद्रे, हरिश्चद्र लहाने, चंद्रचूड चव्हाण, सुरेश लहाने, प्रभाकर केंद्रे, सर्जेराव मोरे, प्रमोद जाधव, प्रवीण पाटील, आजीम मणियार, शिवाजी आचार्य, विवेक चव्हाण, उत्तरेश्वर हलकुडे, उमर पठाण, सिद्धेश्वर गालफडे, अभिजीत चव्हाण, प्रशांत पाटील, गुलाब चव्हाण, सुनील भंडारे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमास काँग्रेसचे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. एकूणच हा प्रवेश काँग्रेस पक्षासाठी उत्साहवर्धक ठरला असून आगामी काळात पक्षसंघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

