14.9 C
Latur
Saturday, November 15, 2025
Homeअंतरराष्ट्रीयशेख हसिना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात येणार? १७ रोजी निकाल; स्फोट, जाळपोळ, कडक बंदोबस्त

शेख हसिना यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात येणार? १७ रोजी निकाल; स्फोट, जाळपोळ, कडक बंदोबस्त

ढाका : वृत्तसंस्था
सरकारने पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना मानवतेविरुद्ध गुन्ह्यांच्या आरोपांत फाशीची शिक्षा सुनावण्याची तयारी केली आहे. देशातील ‘आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणाने’ घोषणा केली की, या प्रकरणाचा अंतिम निकाल १७ नोव्हेंबरला जाहीर केला जाणार आहे.

या घोषणेनंतर ढाकामध्ये तणावाचे वातावरण आहे. माजी पंतप्रधानांचा पक्ष असलेल्या आवामी लीगने ‘ढाका बंद’चे आवाहन केले आहे. अल-जझीराच्या वृत्तानुसार, बुधवारी ३२ बॉम्बस्फोट झाले, ज्यामुळे डझनभर बसेसना आग लागली. राजधानीत ४०० निमलष्करी दल तैनात करण्यात आले.

या खटल्यात शेख हसीनांसह माजी गृहमंत्री असदुज्जमान खान कमाल आणि तत्कालीन पोलीस महानिरीक्षक चौधरी अब्दुल्ला अल-मामून यांच्यावरही आरोप आहेत. हसीना आणि कमाल, दोघांनाही ‘फरार आरोपी’ घोषित करण्यात आले आहे. मुख्य सरकारी वकील मोहम्मद ताजुल इस्लाम यांनी तिन्ही आरोपींना मृत्युदंड देण्याची मागणी केली आहे. मात्र, माजी पोलीसप्रमुख मामून यांनी सुरुवातीला स्वत: उपस्थित राहून खटल्याचा सामना केला, परंतु नंतर सरकारी साक्षीदार बनले. २८ दिवस चाललेल्या सुनावणीत ५४ साक्षीदारांनी साक्ष दिली.

दरम्यान शेख हसिना म्हणाल्या की, मी आंतरराष्ट्रीय निरीक्षणाखाली, अगदी आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायालयात सुद्धा खटल्याला सामोरे जाण्यास तयार आहे, तसेच, जर सरकारचे माझ्यावरील आरोप इतके खात्रीशीर असतील, तर त्यांनी माझ्यावर ‘आयसीसी’मध्ये खटला चालवावा. पण ते तसे करत नाहीत, कारण ‘आयसीसी’ हे निष्पक्ष न्यायालय आहे आणि तिथे मला नक्कीच निर्दोष ठरवले जाईल, असेही ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR