ढाका : वृत्तसंस्था
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर सुरू असलेल्या खटल्यांची अंतिम सुनावणी आज सोमवारी (ता. १७ नोव्हेंबर) पार पडली आहे. विविध गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेल्या हसीनांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्यावर सुरू असलेल्या खटल्यांची अंतिम सुनावणी पार पडली आहे. शेख हसीना यांच्यावर बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात प्राणघातक कारवाईच्या संदर्भात खटला सुरू होता.
याच प्रकरणी आता इंटरनॅशनल क्राइम ट्रिब्युनलने त्यांना दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांच्याविरुद्धचा पहिला आरोप खून, हत्येचा प्रयत्न, छळ आणि इतर अमानवी कृत्यांशी संबंधित आहे. दुस-या आरोपात असा दावा आहे की, हसीना यांनी आंदोलकांना संपवण्याचे आदेश दिले. या आरोपांमध्ये विद्यार्थ्यांना प्राणघातक शस्त्रे वापरण्याचे निर्देश देणे आणि प्रक्षोभक भाषणे देणे यांचा समावेश आहे. इतर आरोपांमध्ये सहा नि:शस्त्र आंदोलकांची हत्या आणि गोळीबार यांचा समावेश आहे.
बांगलादेशच्या आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायाधिकरणाने माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याविरोधात मोठा निर्णय दिला आहे. कोर्टाने शेख हसीना यांना जुलै महिन्यात झालेल्या दडपशाहीत नि:शस्त्र नागरिकांवर गोळीबार करण्याचे आदेश दिल्याबद्दल दोषी ठरवले आहे. या प्रकरणी त्यांना फाशीची शिक्षा होणार आहे.
कोर्टाने हा निर्णय देताना हसीना यांची एक ऑडिओ क्लिप देखील जाहीर केली, जी बांगलादेशात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाली होती. या ऑडिओमध्ये हसीना पोलीस प्रमुखांना लोकांवर गोळ्या चालवण्यास सांगत असल्याचे स्पष्ट होत आहे. कोर्टाने आपला निर्णय देताना मानवाधिकार आयोगाच्या अहवालाचा देखील उल्लेख केला आहे.
वर्षभरापूर्वी म्हणजेच, नोव्हेंबर २०२४ मध्ये बांगलादेशात मोठा हिंसाचार घडला होता. या हिंसाचारानंतर शेख हसीना पंतप्रधान पदावरून पायउतार झाल्या आणि त्या भारताच्या आश्रयाला आल्या. पण बांगलादेशात हा हिंसाचार सुरू असताना हसीना यांनी पोलिसांना आंदोलकांवर गोळ्या झाडण्याचे आदेश दिले. या आंदोलकांमध्ये विद्यार्थ्यांचा सुद्धा सहभाग होता. ज्यामुळे याच प्रकरणावरून त्यांच्यावर अनेक खटले दाखल करण्यात आले होते.
त्यांच्याविरोधात मानवतेविरुद्धचा खटला दाखल करण्यात आला होता. या खटल्यात त्यांना दोषी ठरवत बांगलादेशमधील कउळ न्यायालयाने शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. शेख हसीन सध्या भारतात राहत असून त्यांच्या अनुपस्थितीतच त्यांच्याविरुद्ध हा खटला चालवण्यात आला. ४५३ पानांच्या या निर्णयाचे वाचन करण्यापूर्वी न्यायमूर्ती मोहम्मद गुलाम मुर्तजा मजूमदार यांनी हा निर्णय ६ भागांमध्ये सुनावणी केला जाईल, असे सांगितले होते. त्यानुसार, निकालाचे वाचन करत त्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

