22.9 C
Latur
Thursday, December 5, 2024
Homeमहाराष्ट्रशेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र पहिला

शेतकरी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र पहिला

मुंबई – महाराष्ट्रात या वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांत एकूण १,२६७ शेतक-यांनी आत्महत्या केल्या असून राज्याच्या विदर्भातील अमरावती विभागात ५५७ मृत्यू झाले आहेत.

जानेवारी-जूनच्या आकडेवारीनुसार, छत्रपती संभाजीनगर विभाग ४३० मृत्यूंसह दुस-या क्रमांकावर आहे, त्यानंतर नाशिक विभागात १३७, नागपूर विभागात १३० आणि पुणे विभागात १३ मृत्यू झाले आहेत.

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनुसार, २०२२ मध्ये, देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी ३७.६ % या धक्कादायक आकडेवारीसह महाराष्ट्रा आघाडीवर आहे. एनसीआरबीने म्हटले आहे की,५,२०७ शेतकरीकिंवा शेती करणारे आणि ६,०८३ शेतमजूर असलेल्या ११,२९० व्यक्तींनी २०२२ मध्ये आपले जीवन संपवले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR