चाकूर : प्रतिनिधी
शेतकरी, महिला आणि युवक हेच माझे प्राधान्य, शासनाच्या योजना थेट शेतक-यांच्या बांधापर्यत पोचतील, असे नियोजन करणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावाचा चेहरामोहरा बदलणार आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्य स्वयंपूर्ण करणे हाच खरा विकास आहे. कामाची संधी द्या, विकास करून दाखवतो, शेतरस्ते, आरोग्य, शिक्षण आणि जलसिंचन हाच खरा अजेंडा असल्याचे कॉग्रेस आघाडीचे उमेदवार अनिल चव्हाण यांनी सांगितले.
तालुक्यातील नळेगाव जिल्हा परिषद गट खुला प्रवर्ग असल्याने येथे निवडणूक अत्यंत रंगतदार होत आहे. काँग्रेसकडून काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी प.स.सदस्य अनिल विश्वनाथ चव्हाण हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. मतदारसंघात त्यांनी प्रत्यक्ष मतदारांशी संपर्क वाढविला आहे. नळेगाव जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात पंचायत समिती, नळेगाव गणातून अमजद फत्तूसाब घोरवाडे (काँग्रेस आघाडी)आणि पंचायत समिती सुगाव गणातून अशोक पांडुरंग नागिमे (काँग्रेस आघाडी) यांनाही मतदारसंघात चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. अनिल चव्हाण यांनी राजकारण करीत असताना ८० टक्के समाजकारणाला प्राधान्य देत कामे केली. रक्तदान शिबीरे आयोजित करून रक्तसंकलन, लोकसहभागातून वैंकुठ रथ, व्याख्यानमाला आयोजित करून जनजागृती, पंचायत समिती सदस्य असताना गणातील नागरिकांना विविध शासकीय योजनेचा लाभ मिळवून दिला. विविध शेती अवजारे सबसिडी वर उपलब्ध करून दिली.

