शिरूर अंनतपाळ : प्रतिनिधी
शिरूर अनंतपाळ विशाल सोसायटीच्या वतीने बुधवारी अनंतपाळ मंगल कार्यालयात आयोजित विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रति एक झाड याप्रमाणे संस्थेच्या शेतकरी सभासदांना २१०० केशर आंबा रोपांचे वाटप करण्यात आले. सोसायटीने राबविलेल्या या उपक्रमाचे शेतकरी सभासदातून कौतुक केले जात आहे.
ध्यक्षस्थानी काशीनाथ देवंगरे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा बँकेचे संचालक अनुप शेळके, नायब तहसीलदार तानाजीराव यादव, जिल्हा कृषि अधिकारी बीडबाग, तालुका कृषी अधिकारी लक्ष्मण खताळ, सहायक निबंधक वसंत घूले, गटविकास अधिकारी बी. टी.चव्हाण, पोलिस निरीक्षक विठ्ठल दराडे, माजी सभापती धोंडीराम सांगवे, नगरसेवक संदीप बिराजदार, संतोष शिवणे, ओम बरगे, सुधीर लखनगावे, रतन शिवणे, दत्ता शिंंदे, अनिल देवंगरे, अशोक कोरे, व्यंकट हंद्राळे, सोमा तोंडारे उपस्थित होते.
दरम्यान शिरूर अनंतपाळ विशाल सोसायटी ही तालुक्यात सर्वात मोठी सोसायटी असून शिरुर अनंतपाळ शहरासह हणमंतवाडी, नागेवाडी, बोळेगाव बु. आनंदवाडी, तुरूकवाडी व भिंगोली असे संस्थेचे सात गावांतर्गंत कार्यक्षेत्र असून चेअरमन रामकिशन गड्डीमे यांनी सहकारी संचालकांच्या सोबतीने १० कोटी २५ लाख रुपयांचे शेतकरी सभासदांना कर्ज वाटप केले. या कर्जापोटी संस्थेचे चेअरमन,व्हा.व सर्व संचालकांच्या विशेष परिश्रमाने सलग दोन वर्ष शंभर टक्के वसुली केली आहे. संचालक मंडळाने सोसायटीच्या माध्यमातून अनेक शेतकरी उपयोगी उपक्रम राबवून सोसायटी नावारूपाला आणली आहे.
प्रास्ताविकात सोसायटीचे चेअरमन रामकिशन गड्डीमे यांनी सोसायटीच्या वतीने राबविण्यात आलेल्या उपक्रमाची माहिती दिली. सोसायटी शेतकरी हितासाठी काम करणार असल्याचे सांगितलेले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्हाईस चेअरमन गुरुंिलंग शिवणे, गटसचिव नवनाथ गिरी, संचालक हिरालाल दुरूगकर, बाबु इंद्राळे, फक्रोद्दीन मुजेवार, नारायण नरवटे, शब्बीर पटेल, औदुंबर शिंदाळकर, मुरलीधर दिवेकर, प्रभावती बिराजदार, कुसूम तोंडारे, नामदेव लोखंडे, अरंिवंद चेवले, सोसायटी कर्मचारी संजीव देवंगरे, अनंत गुगळे गणेश कामगुंडा यांनी परिश्रम घेतले. यावेळी संस्था अंतर्गंत शेतकरी सभासद व नागरिक उपस्थित होते.