22.2 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्रशेतक-यांची फसवणूक करणा-या व्यापा-यांविरोधात कायदा करणार

शेतक-यांची फसवणूक करणा-या व्यापा-यांविरोधात कायदा करणार

राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची माहिती
नाशिक : प्रतिनिधी
शेतक-यांची फसवणूक करणा-या व्यापा-यांविरोधात कायदा करणार असल्याची घोषणा राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी नाशिकमध्ये केली. नव्या कायद्यात शेतक-यांची फसवणूक करणा-या व्यापा-यांवर कठोर कारवाईची तरतूद करणार असल्याचे कोकाटे यांनी सांगितले.

शेतक-यांच्या फसवणूक करणा-यांच्या विरोधात कोणत्या कायद्यान्वये कारवाई करायची, याची अडचण असते. त्यामुळे नवा कायदा आवश्यक असल्याचे माणिकराव कोकाटे यांनी सांगितले. आम्ही जोपर्यंत कायदा तयार करत नाही, तोपर्यंत व्यापा-यांच्या नावांची यादी करता येणार नाही. त्यामुळे जोपर्यंत कायदा होत नाही, तोपर्यंत कोणत्या शेतक-यांनी कोणत्या व्यापा-यांना शेत माल विक्री करावा, याबाबतची यादी करता येत नाही. शेतक-यांच्या फसवूणक टाळण्यासाठी पोलिसांनी कारवाई कशी करावी, याबाबतचा निर्णय पोलिस दलातील अधिका-यांना घ्यावा, अशा सूचना दिल्या आहेत, असे माणिकराव कोकाटे म्हणाले. शेतक-यांची फसवणूक करणा-यांविरोधात कारवाई करणारा कायदा आणताना पणनमंत्री जयकुमार रावल यांच्याशी चर्चा करणार असल्याचे कोकाटे म्हणाले.

कृषि खाते संवेदनशील असून मी त्याच्या दुप्पट संवेदनशील आहे. शेतक-यांचे फोन उचलले जातील, कारवाई केली जाईल, न्याय दिला जाईल. वेळ पडल्यास गृहमंत्री, मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. याशिवाय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलणार आहे. शेतक-यांच्या हितासाठी कठोर कायदा केला जाईल, मंत्रिमंडळात विषय मांडला जाईल, असे माणिकराव कोकाटे म्हणाले. पोलिस अधिकारी जाणीवपूर्वक व्यापा-यांना वेगळी वागणूक देतात, याबाबतचे प्रकरण समोर आल्यास कठोर कारवाई करणार असल्याचे माणिकराव कोकाटे म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR