लातूर : प्रतिनिधी
शेतकरी, शेतमजूरांना फसवे आश्वासन देत सत्तेवर आरुढ झालेल्या महायुती सरकारच्या फसव्या धोरणाविरोधात जिल्हा काँग्रेसने छत्रपती शिवाजी महाराज चौक याठिकाणी खासदार डॉ. शिवाजीराव काळगे यांच्यासह प्रमुख पदाधिका-यांच्या उपस्थितीत दि. ३ मार्च रोजी आंदोलन केले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
महायुतीच्या जाहीरनानाम्यात दिलेल्या आश्वासनांनुसार शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी लागू करावी, शेतक-यांना दिवसा आठ तास वीज पुरवठा द्यावा, कृषी अवजारावरील जीएसटी रद्द करावी, सोयाबीन संशोधन केंद्र हे लातूरला व्हावे, देवणी वळू संशोधन केंद्र पूर्ववत सुरू करावे, शेतक-यांना २ वर्षांपासून ठिबक सिंचनाचे अनुदान मिळत नाही, त्याची देयक शेतक-यांना तात्काळ अदा करावीत, सोयाबीन खरेदी केंद्र बंद झाल्यास ज्या शेतक-यांनी सोयाबीन बाजारामध्ये विकले आहेत अशा शेतक-यांना भाव फरक तात्काळ मिळावा, दूध दरवाढ लागू करावी यासह शेतक-यांच्या प्रश्नांबाबत ना सरकारला चाड ना प्रशासनाला घेणदेणं याचा निषेध व्यक्त करत बळीराजाच्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनाकडे न देता छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अर्पण करून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
याप्रसंगी सर्जेराव मोरे, प्रमोद जाधव, विजय देशमुख, रवी काळे, शीलाताई पाटील, प्रवीण सूर्यवंशी,अनिल चव्हाण, प्रवीण बिरादार, सिराजुद्दीन जहागीरदार, प्रा. एकनाथ पाटील, विपुल हाके, राम स्वामी, अरविंद भातांब्रे,प्रवीण पाटील, किशोर टोम्पे, रामराजे काळे, सुभाष घोडके, विजयकुमार पाटील, कल्याण पाटील, मारुती पांडे, दत्तोपंत सूर्यवंशी, अजहर हाश्मी, महेश धूळशेट्टी, विलास पाटील, हुसेन शेख, चंद्रकांत मद्दे, उदयसिंह देशमुख, विद्याताई पाटील, सईताई गोरे, पल्लवी जाधव, लाला पटेल, बाळासाहेब सांगवे, श्याम सूर्यवंशी, यश चव्हाण, प्रकाश मिरगे, किरण बाबळसुरे, माधव बिराजदार, खूनमीर मुल्ला, जयराज कसबे, मुरलीधर सोनटक्के, अशोक बनसोडे, कमलाकर अनंतवाड, किरण मुक्तापुरे, रोहित पाटील, संजय लोंढे, सुशील पाटील, रवी पाटील, सुमित आरीकर यांच्यासह सर्व फ्रंटल ऑर्गनायझेशनचे जिल्हाध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष, पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित
होते.