22.8 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeलातूरशेतक-यांना १०० टक्के अनुदानावर मिळणार फवारा पंप

शेतक-यांना १०० टक्के अनुदानावर मिळणार फवारा पंप

देवणी : बाळू तिपराळे
सोयाबीन, तूर, उडीद, मूग, कापूस व इतर तेलबिया पिकांची उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासासाठी विशेष कृती योजनेंतर्गत २०२४- २०२५ या वर्षांकरिता शेतक-यांना अनुदानावर बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करता येणार आहे. शेतक-यांंना शंभर टक्के अनुदानावर फवारणी पंप मिळणार आहे. शेतक-यांंना महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. १४ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, शेतक-यांंनी ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
शेतक-यांसाठी राज्य सरकारच्या कृषी विभागाकडून राज्य पुरस्कृत एकात्मिक, ऑनलाईन पद्धतीने महा डीबीटी पोर्टलवर केलेल्या अर्जातून शेतक-यांंची निवड करण्यात येणार आहे. ही योजना शंभर टक्के अनुदानावर आहे. यामुळे अधिकाधिक शेतक-यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी विभाग देवणी यांच्याकडून करण्यात आले आहे. या योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. योजनेसाठी आधार कार्ड, ७/१२ उतारा, ८ अदाखला, खरेदी करावयाच्या अवजाराचे कोटेशन व केंद्र शासनाच्या मान्यताप्राप्त तपासणी संस्थेने दिलेला तपासणी अहवाल, जातीचा दाखला (अनु. जाती व अनु. जमातीसाठी), स्वयंघोषणापत्र, पूर्वसंमती अशी काही कागदपत्रे लागणार आहेत.
 शेतक-यांनी शंभर टक्के अनुदानावर बॅटरी संचलित फवारणी पंप वितरित केले जाणार आहेत. महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज, निवड प्रक्रिया राबवली जाणार आहे. तालुक्यातील पात्र शेतक-यांनी १४ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी  एस, आर, पाटील  यांनी केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR