21.9 C
Latur
Tuesday, January 28, 2025
Homeमहाराष्ट्रशेतक-यांबाबत सरकारचा दुटप्पीपणा

शेतक-यांबाबत सरकारचा दुटप्पीपणा

मुंबई : प्रतिनिधी
शेतक-यांना कर्जमाफी देण्याचे, नोकर भरती करण्याचे आश्वासन देऊन भाजपा युती सत्तेत आली आहे पण आता हे सरकार कर्जमाफी देण्यासाठी, नोकर भरतीसाठी निधी नाही असे सांगत आहे पण दुस-याकडे सरकार बगलबच्च्यांवर सवलतींची खैरात करत साखर कारखान्यांचे १०० कोटी रुपयांचे व्याज माफ करते हा सरकारचा दुटप्पीपणा आहे अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर केली आहे.

दरम्यान, वाढती महागाई, बेरोजगारी या विषयी मुंबई येथील पत्रकार परिषदेत बोलताना पटोले म्हणाले, एसटी, रिक्षा व टॅक्शीची भाडेवाढ करून सरकारने जनतेला महागाईच्या संकटात लोटले आहे.
लोकांनी लोकांसाठी निवडून देण्याच्या लोकशाही व्यवस्थेलाच निवडणूक आयोग व भाजपा सरकारने बगल देत मतदारांच्या मतदानावर दरोडा टाकण्याचे काम केले आहे, हा प्रकार लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. आपल्या पूर्वजांनी बलिदान देऊन स्वातंत्र्य मिळवले व लोकशाही व संविधान दिले त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली असून झोपेचे सोंग घेतलेल्या निवडणूक आयोग व सरकारला जागे करण्याची वेळ आली आहे, असे पटोले यांनी म्हटले आहे.

देशात लोकशाही व संविधान संपवण्याचे काम सुरु आहे. ड़ॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना मतदानाचा अधिकार दिला पण या अधिकारावरच भाजपा निवडणूक आयोगाच्या मदतीने दरोडा टाकत आहे. नुकत्याच पार पडललेल्या विधानसभा निवडणूक प्रक्रियेत सर्व पातळ्यांवर घोटाळे करण्यात आले. मतदार याद्या, मतदान व मतमोजणीत घोळ करून भाजपा सत्तेत आणण्यासाठी निवडणूक आयोगाने मदतच केली आहे.

लोकशाहीसाठी घातक
काँग्रसने या घोटाळ्याविरोधात आवाज उठवला असून निवडणूक आयोगाकडे मतदारयाद्या व वाढलेल्या मतदानाची सर्व माहिती मागितली पण निवडणूक आयोग माहितीच देत नाही. निवडणूक आयोगने आता सर्व डेटा डिलीट करून टाकला आहे, हा प्रकार अत्यंत गंभीर व लोकशाहीसाठी घातक आहे असे पटोले म्हणाले. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी यावेळी जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR