26.6 C
Latur
Sunday, November 24, 2024
Homeसोलापूरशेतीच्या वादातून खून केल्याप्रकरणी चौघे निर्दोष

शेतीच्या वादातून खून केल्याप्रकरणी चौघे निर्दोष

सोलापूर : माढा तालुक्यातील फूटजवळगाव येथे पाच वर्षांपूर्वी शेतीच्या कारणावरून चंद्रकांत हांडे यास कु-हाडीने डोक्यात घाव घालून खून केल्याप्रकरणी हनुमंत कोळेकर, बायडाबाई कोळेकर, दत्तात्रय हांडे, आदिनाथ हांडे, हरिदास हांडे यांच्यावर भरलेल्या खटल्याची सुनावणी बार्शी येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एन.एस. चव्हाण यांच्यासमोर होऊन त्यांनी चौघांची निर्दोष मुक्तता केली, मात्र हनुमंत कोळेकर यास जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.

यात हकिकत अशी की, ५/१०/२०१९ रोजी वरील सर्व आरोपींनी शेतीच्या कारणावरून चंद्रकांत हांडे यांच्या डोक्यात कु-हाडीने घाव घालून जखमी केले, जखमी अवस्थेत त्यास उपचारासाठी दवाखान्यात दाखल केले असता उपचारादरम्यान चंद्रकांत हांडे यांचा मृत्यू झाला, अशा आशयाची फिर्याद मयताचा मुलगा सूर्यकांत हांडे यांनी पोलिस ठाण्यात दिली होती. त्यावरून पोलिसांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले होते.

सरकार पक्षातर्फे एकंदर १४ साक्षीदार तपासण्यात आले. खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील अ‍ॅड मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात हॉटेल त्रिमूर्ती येथे आरोपींनी चंद्रकांत याच्या खुनाचा कट रचला, त्याबाबतचा हॉटेल त्रिमूर्ती अस्तित्वात असल्याचा पुरावा सरकार पक्षाकडून शाबीत झाला नसल्याचा युक्तिवाद मांडला, त्यावरून न्यायाधीशांनी चार आरोपींची निर्दोष मुक्तता केली, मात्र आरोपी हनुमंत कोळेकर यास जन्मठेप व १०,००० रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.यात शिक्षा झालेल्या आरोपी नं १ तर्फे अ‍ॅड. प्रशांत एडके तर निर्दोष झालेल्या आरोपी तर्फे अ‍ॅड. मिलिंद थोबडे, अ‍ॅड. सागर रोडे , अ‍ॅड. निखील पाटील यांनी तर सरकारतर्फे अ‍ॅड.राजश्री कदम यांनी काम पाहिले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR