27.5 C
Latur
Wednesday, April 2, 2025
Homeराष्ट्रीयशैक्षणिक धोरण, व्यवस्थेवरून सोनिया गांधींची सरकारवर टीका

शैक्षणिक धोरण, व्यवस्थेवरून सोनिया गांधींची सरकारवर टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी भारताच्या नव्या शैक्षणिक धोरणावरुन मोदी सरकारवर शाब्दीक हल्ला चढवला आहे. त्यांनी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरणावर कडाडून टीका केलीे. ‘मोदी सरकार संघीय शिक्षण रचनेला कमकुवत करत आहे. ते ‘३ सी’ एजेंडा पुढे चालवत आहेत. त्या माध्यमातून ते शिक्षण व्यवस्थेवर प्रहार करत आहेत’ अशी टीका त्यांनी केली.

एका इंग्रजी वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखात सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणात शिक्षणाचे केंद्रीकरण, व्यावसायिकरण आणि सांप्रदायिकीकरण सुरु असल्याचे म्हटलं आहे. सोनिया गांधी यांनी केंद्रावर, संघीय शिक्षा व्यवस्थेला कमकुवत केल्याचा आरोप केला आहे. मोदी सरकार राज्य सरकारांना महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयाच्या बाहेर ठेऊन शिक्षणाचा संघीय पाया कमकुवत करत आहे अशी टीका सोनिया गांधी यांनी केली.

काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी या लेखात ८९ हजार शाळा बंद होण्याचा, भाजप-आरएसएसशी संबंधित लोकांची भरती असे मुद्दे उपस्थित केले. राष्ट्रीय शिक्षण धोरण हे भारतातील मुलं आणि युवकांच्या शिक्षणाप्रती उदासीन आहे. यात शिक्षण प्रणालीला जनसेवेच्या भावनेपासून वंचित ठेवण्यात आल्याचे म्हटलं आहे. शिक्षणाच्या गुणवत्तेशी तडजोड करण्यात आली. भारतात शिक्षण व्यवस्थेची हत्या बंद झाली पाहिजे, असं म्हटलं आहे.

चर्चेविना एनईपी-२०२० लागू
मागच्या ११ वर्षात अनियंत्रित केंद्रीकरण ही या सरकारच्या कार्यप्रणालीची खासियत राहिल्याची टीका सोनिया गांधी यांनी केली. २०१९ पासून केंद्रीय शिक्षण सल्लागार बोर्डाची बैठक झालेली नाही. या बैठकीत केंद्र आणि राज्याचे शिक्षण मंत्री सहभागी होतात. बोर्डाची अखेरची बैठक सप्टेंबर २०१९ मध्ये झाली होती. राज्य सरकारांशी चर्चा केल्याशिवाय ‘एनईपी-२०२०’ लागू करण्यात आल्याचा आरोप सोनिया गांधी यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR