29.7 C
Latur
Wednesday, February 5, 2025
Homeमहाराष्ट्रश्रीकर परदेशी मुख्यमंत्र्यांचे सचिव

श्रीकर परदेशी मुख्यमंत्र्यांचे सचिव

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी तिस-यांदा शपथ घेतली. त्यानंतर आज मोठा निर्णय घेत २००१ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी श्रीकर परदेशी यांची बदली करण्यात आली असून, त्यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली. परदेशी यांनी यापूर्वीही देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केले आहे. तसेच त्यांनी प्रतिनियुक्तीवर पीएमओमध्येदेखील काम केले आहे.
यापूर्वी १२ जुलै २०२२ रोजी श्रीकर परदेशी यांची तत्कालीन उपमुख्यमंत्र्यांचे उपसचिव म्हणून बदली करण्यात आली होती. त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते. म्हणजेच आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर श्रीकर परदेशी यांची मुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून बदली करण्यात आली.

कोण आहेत श्रीकर परदेशी?
श्रीकर परदेशी भारतीय प्रशासकीय सेवेतील २००१ च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे अधिकारी आहेत. त्यांनी विविध जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त म्हणून काम केले आहे. ते नांदेडचे जिल्हाधिकारी होते. याशिवाय पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यानंतर काही दिवस पीएमओमध्ये प्रतिनियुक्तीवर काम केले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार ३० जून २०२२ ला स्थापन झाले तेव्हा श्रीकर परदेशी यांना सिकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून उपमुख्यमंत्र्यांचे मुख्य सचिव म्हणून नियुक्त केले होते. परदेशी हे सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळचे आहेत. त्यांचे एमबीबीएस-एमडीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. २००१ मध्ये ते महाराष्ट्रातून पहिल्या प्रयत्नात यूपीएससी उत्तीर्ण झाले होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR