27 C
Latur
Tuesday, May 13, 2025
Homeलातूरश्रीकिशन सोमाणी विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के  

श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचा दहावीचा निकाल १०० टक्के  

लातूर : प्रतिनिधी
येथील अभिनव मानव विकास संस्थाद्वारा संचालित श्रीकिशन सोमाणी विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. मागच्या सलग १४ वर्षांपासून दैदिप्यमान निकालाची परंपरा यावर्षीही विद्यालयाने कायम राखली आहे. विद्यालयातील दोन विद्यार्थिनींनी १०० पैकी १०० टक्के गुण  संपादन करण्यात यश मिळवले आहे.
श्रीकिशन सोमाणी विद्यालयाच्या एकूण १५२ विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. या परीक्षेत सगळेच्या सगळे १५२ विद्यार्थी  उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयाच्या कु. सृष्टी दत्तात्रय शिंदे व  कु. भावना किशोर ठोंबरे या दोन विद्यार्थिनींनी १०० टक्के गुण  संपादन करून विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा  तुरा रोवला आहे. विद्यालयाच्या ७२ विद्यार्थ्यांनी ९० ते ९९ टक्के गुण मिळविले  आहेत. ४९ विद्यार्थ्यांनी ७५ ते ८९. ९ टक्के, २३ विद्यार्थ्यांनी ६० ते ७४. ९ टक्के तर ०३ विद्यार्थ्यांनी ४५ ते ५९. ९ टक्के गुण  मिळविले आहेत. विषयनिहाय सर्वाधिक गुण  घेणा-या विद्यार्थ्यांमध्ये मराठीत सर्वाधिक ९८ गुण  ०२ विद्यार्थ्यांनी मिळविले आहेत. संस्कृतमध्ये ३० विद्यार्थ्यांनी  १०० गुण मिळविले आहेत. हिंदीत एका विद्यार्थ्यांला ९७ गुण मिळाले आहेत. इंग्रजीमध्ये दोन विद्यार्थ्यांनी ९८ गुण मिळविले आहेत. गणित , विज्ञान ,  इतिहास भूगोल – नागरिकशास्त्र या विषयात अनुक्रमे ०१, ०३ व ०५ विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण  मिळविले आहेत.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. चेतन सारडा, उपाध्यक्ष विवेक रेड्डी, सचिव कमलकिशोर अग्रवाल, कोषाध्यक्ष जयेश बजाज, शालेय समिती अध्यक्ष अतुल देऊळगावकर,  मुख्याध्यापक रमाकांत स्वामी, पर्यवेक्षक गिरीश कुलकर्णी, राहुल पांचाळ, सुनीता जाधव यांसह  सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचा-यांनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR