रेणापूर : प्रतिनिधी
रेणापूर येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने दि. २१ मार्च रोजी श्रीफळ वाढऊन जनावरांचा बाजारांचा शुभारंभ करण्यात आला. गत वर्षी पासून बाजार समितीने जनावरासाठी , व्यापारी व शेतकरी याच्यासाठी सुविधा दिल्यामुळे मोडकळीस आलेला जनावरांच्या बाजाराला सुरुवात झाली.
रेणापूर येथील जनावरांचा बाजार मराठवाडयात प्रसिद्ध होता परंतु बाजारात व्यापारी शेतकरी यांच्यासाठी आवश्यक असणा-या सोयी सुविधा नसल्याने हा बाजार मोडकळीस येण्याच्या मार्गावर होता . जनावरांच्या बाजाराचे गतवैभव पुन्हा प्राप्त करण्यासाठी माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, लातुर ग्रामीणचे माजी आ. धिरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली येथील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती, उपसभापती व संचालक मंडळाने जनावरांच्या बाजारासाठी आवश्यक असणा-या सुविधा गत वर्षी दिल्या त्यामुळे जून पर्यंत बाजार सुरू होता. यावर्षीच्या जनावरांच्या बाजारांचा शुभारंभ लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेचे उपाध्यक्ष अॅड. प्रमोद जाधव, कृउबाचे सभापती उमाकांत खलंग्रे, उपसभापती अॅड. शेषेराव हाके पाटील, सहाय्यक उपनिबंधक आर. जी. गडेकर व संचालक मंडळ, शेतकरी, व्यापारी यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवुन करण्यात आला.
यावेळी संचालक नागनाथ कराड, कमलाकर आकनगिरे, प्रकाश सूर्यवंशी , अॅड. मुरलीधर पडोळे, बाळासाहेब खटाळ, कॉग्रेसचे शहराध्यक्ष पद्मसिंह पाटील, भुषण पनुरे, सचिन इगे, सचिन मोटेगावकर, चेतन एकुरके, पाशाभाई शेख व नारायण देशमुख , अतिक कुरेशी, शिवाजी आसले, झाकीर कुरेशी, बालाजी राठोड , लक्ष्मण साखरे, योगेश सुरवसे, लक्ष्मण गिरी, हरिबा राठोड, विकास चोरमले, दिपक राठोड, विश्वनाथ राठोड, बाळु चव्हाण, गुणाजी गवळी, शंकर कापसे, रामू कु-हाडे, काशिसाब तांबोळी, विठ्ठल हाके, अजीमोदिदन, बाबाभाई मिरान्नी, बाबु गिरी, अयाज शेख, खैरसअली सय्यद, फारुक कुरेशी, अमीर पठाण, शफीक शेख, सिकंदर शेख यांच्यासह शेतकरी व्यापारी उपस्थित होते. गत वर्षीच्या सुरुवातीच्या एक दोन बाजाराला म्हणावा तसा शेतकरी, व्यापारी यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नव्हता या वर्षी मात्र बाजार समितीकडून शेवटच्या बाजारापर्यंत जनावरांच्या पाण्याची व्यवस्था, लाईट यासह आदी सुविधा दिल्यामुळे पहिल्याच बाजारात शेतकरी व व्यापारी मोठया संख्येने आले
होते.