सोलापूर : श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारे युवा प्रेरणा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. रविवार दि २३ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी ५ वाजता हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष महेश कासट यांनी दिली.
युवा दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीमत्वाचा या पुरस्काराने गौरव करण्यात येणार आहे. रविवारी रंगभवन समोरील समाजकल्याण केंद्रात हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे हे पाचवे वर्ष आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सोलापूर सिध्देश्वर सहकारी बँकेचे चेअरमन नरेंद्र गंभीरे, नीलकंठ को-आँप बँकेचे व्हाईस चेअरमन धनराज नोगजा, नगर रचना विभागाचे लिपिक श्रीकृष्ण मस्तूद, छत्रपती शिवाजी नाईट कॉलेजचे माजी ग्रंथपाल नागनाथ नवगिरे, सुखकर्ता रुग्णालयचे डॉ. योगिराज बिराजदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यास सर्वानी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थापक महेश कासट, संतोष अलकुंटे, प्रकाश आलंगे, गणेश येळमेली, दिपक करकी, अभिजीत व्होनकळस, राजेश केकडे, महेश ढेंगले यांनी केले.
पुरस्काराचे मानकरी
विवेक ओझा (वित्त व लेखा व्यवस्थापक-महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी सोलापूर मंडळ कार्यालय), डॉ. निखिल नवले (वैद्यकीय), शंशाक भोसले (अम्बिशन इन्स्टिट्यूट), प्रा. रेखा राजमाने (चंडक पालिटेक्निक कॉलेज), महेश भाईकट्टी (सामाजिक-अनुभव प्रतिष्ठान), चेतन देवरकोंडा ( इव्हेंट मँनेजमेंट) आदी या पुरस्काराचे मानकरी आहेत. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.