21.9 C
Latur
Friday, February 20, 2026
Homeलातूरश्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते हरिनाम सप्ताहासाठी धान्याचा ट्रक रवाना

श्रीमती वैशालीताई देशमुख यांच्या हस्ते हरिनाम सप्ताहासाठी धान्याचा ट्रक रवाना

लातूर : प्रतिनिधी
प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी श्री सार्वजनिक शिवजयंती महोत्सव शिवछत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लातूरच्या वतीने आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा निमित्त अखंड हरीनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळ्यासाठी धान्याचा ट्रक रवाना करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी आमदार वैजनाथराव शिंदे, बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, माजी सभापती ललितभाई शहा, संचालक सुभाष घोडके, बालाप्रसाद बिदादा, चंद्रकांत पाटील, सुधीर गोजमगुंडे, रमेश सूर्यवंशी, कालिदास खाडप, तुळशीराम गंभीरे, अशोक (गट्टू) अग्रवाल, संजय मान,े प्रशांत खाडप यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पुजन करुन आरती करण्यात आली. त्यानंतर जिजाऊं वंदना झाली. यावेळी बोलताना श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी सर्व शिवभक्तांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याचे अनुकरण प्रत्येकांनी करावे, असे आवाहन केले.
श्री. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज माऊली व श्री. जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पादुका पालखी मिरवणुकीनिमित्त दि. २१ फेबु्र्रवारी  ते दि. २ मार्चदरम्यान  त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सव सोहळा निमित्त अखंड हरीनाम सप्ताह व संगीत गाथा पारायण सोहळा नवीन कृषी उत्पन्न बाजार समिती प्रांगण खंडापुर एमआयडीसी लातुर येथे मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येणार आहे. तेथे मोठ्या प्रमाणात पुरुष-स्त्री कीर्तनकार, प्रवचनकार, विणेकरी, टाळकरी, मृदंग वादक, भालदार, चोपदार, पताकाधारी व विविध वारकरी सांप्रदायिक दिंडी तसेच भाविक मोठ्या  संख्येने जमा होणार आहेत. या भाविकांच्या भोजनासाठी मार्केट यार्डातून गोड्या तेलाचे ४५१ डबे व ११ कट्टे तूरदाळीचा ट्रक चेअरमन वैशालीताई विलासराव देशमुख यांच्या हस्ते रवाना करण्यात आला. प्रारंभी श्री सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमर पवार यांनी सर्व पाहूण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी, आडते, हमाल, मापाडी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR