25 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeलातूरश्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयात बारावी परीक्षार्थ्यांचे स्वागत

श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयात बारावी परीक्षार्थ्यांचे स्वागत

लातूर : प्रतिनिधी
मांजरा चॅरिटेबल ट्रस्ट संचलित येथील श्रीमती सुशीलादेवी देशमुख महाविद्यालयात इयत्ता बारावी विज्ञान शाखा ३०० व कला शाखा १११ परीक्षार्थी  परीक्षा देत आहेत. या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी नायब तहसीलदार सुधीर देशमुख, माजी कुलगुरु तथा माजी प्राचार्य मधुकर गायकवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय पाटील, केंद्र संचालक प्रा. दादासाहेब लोंढे, सहाय्यक केंद्र संचालक प्रा. संजय मोरे यांनी पुष्प देऊन स्वागत केले तसेच शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्थानिक दक्षता पथकाचे सदस्य प्रा. मोहाळे शिवाजी, प्रा. डॉ. बाळू कांबळे, प्रा. डॉ. वेदप्रकाश मलवाडे, प्रा. संजयादेवी पवार, प्रा.रत्नमाला पालकर, कार्यालयीन सदस्य प्रकाश पाटील, संजय मुंडे आणि महाविद्यालयातील सहकारी प्राध्यापक वृंद यांनी  परीक्षेचा पहिला दिवस परीक्षार्थी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत  व शुभेच्छा देण्याबरोबरच विद्यार्थ्यांना त्यांच्या वर्गात बसण्यासाठी सर्व ती मदत सहका-यांनी केली.
परीक्षा संदर्भातील महत्त्वाच्या सूचना केंद्र संचालक प्रा. दादासाहेब लोंढे आणि प्रा. संजय मोरे यांनी दिल्या. नायब तहसीलदार सुधीर देशमुख यांनी सर्व विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा देण्यासाठी शुभेच्छा दिल्या. प्रारंभी प्रास्ताविक विचार मांडताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय पाटील यांनी शैक्षणिक गुणवत्ता संपादन करण्यासाठी नियमित अभ्यास करावा. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांनी पूर्णवेळ अभ्यासाकडे लक्ष द्यावे. मोबाईलचा वापर टाळावा, असे सांगितले. माजी कुलगुरु  तथा प्राचार्य मधुकर गायकवाड यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांनी परीक्षेच्या कालावधीत आपल्या प्रकृतीची विशेष काळजी घ्यावी. सात्विक व पोषक आहार घ्यावा. उन्हात फिरु नये. अभ्यासाबरोबरच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी प्रयत्न करावे. उन्हाळी सुट्ट्यांमध्ये प्रवास करा. आवडते छंद जोपासा. या संदर्भात मौलिक माहिती दिली. महाविद्यालयातील सेवक बालाजी कुंभार यांनी विशेष परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR