22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमनोरंजन‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ चित्रपट ६ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ चित्रपट ६ सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : प्रतिनिधी
मराठी माणूस म्हटले की, तो रिस्क घेऊन उद्योग करण्यापेक्षा नोकरी करण्यामध्ये समाधान मानणारा आहे. आपल्या सभोवताली अनेक बेरोजगार तरूण स्वत:चा छोटा, मोठा व्यवसाय सुरू करण्याचा प्रयत्न न करता नोकरी शोधण्याच्या मागे लागलेले दिसतात. नोकरभरतीतील भ्रष्टाचार आणि पेपरफूटी प्रकरण तर नोकरीच्या शोधात असलेल्या प्रत्येक उमेदवारांच्या प्रवासातील मोठे अडथळे ठरत आहेत. याच गंभीर विषयाला वाचा फोडणारा ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत असून या चित्रपटाचा उत्कंठावर्धक ट्रेलर सोशल मिडियावर प्रदर्शित झाला आहे.

उत्तेजना स्टूडिओज प्रा. लि. निर्मित ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ या चित्रपटात जनक सिंह आणि समीर रंधवे हे दोघे झुंजारू उद्योजक आहेत. त्यांच्या कॅफेच्या शाखा विस्तारण्यासाठी ते एका गुंतवणूकदाराच्या शोधत असतात. जनकच्या सभ्य व्यक्तिमत्वामध्ये आणखी एक पैलू दडलेला आहे, तो रात्रीच्या अंधारात ए. के. नावाच्या गुन्हेगाराचा शोध घेत आहे. त्याला पकडायला जनक सिंह कुठल्याही थरापर्यंत जाण्यास तयार आहे. तर कोण आहे ए. के.? जनक त्याला का शोधतोय? आणि त्यांचा काय संबंध आहे? या सर्व प्रश्नांची उकल या चित्रपटातून होणार आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक अजिंक्य उपासनी म्हणाले, मराठी माणसांनी मराठी सण-उत्सवाला माराठी चित्रपट पहावेत. श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन या चित्रपटाला सोशल मीडिया वर उदंड प्रतिसाद मिळतोय.
डॉ. पार्थसारथी आणि सौ. प्रेरणा उपासनी यांनी ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटात अभिनेता गौरव उपासनी, अथर्व देशपांडे, वैभव रंधवे, सायली वैद्य, संपदा गायकवाड आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत. ‘श्रीयुत नॉन महाराष्ट्रीयन’ हा मराठी चित्रपट येत्या गणेशोत्सवात म्हणजेच ६ सप्टेंबर २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR