36.3 C
Latur
Saturday, April 19, 2025
Homeमहाराष्ट्रश्रीवर्धनमध्ये समुद्रात बुडून ३ तरुणांचा मृत्यू

श्रीवर्धनमध्ये समुद्रात बुडून ३ तरुणांचा मृत्यू

रायगड : रायगडमध्ये समुद्रात बुडून ३ तरुणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. श्रीवर्धनच्या वेळास समुद्रकिना-यावर ही घटना घडली. पोहण्यासाठी तिन्ही तरुण समुद्रात उतरले. पण पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तिघेही समुद्रात बुडाले. स्थानिक नागरिकांनी या तिघांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तिघांनाही बाहेर काढले पण तोपर्यंत उशीर झाला होता. तिघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, रायगडच्या श्रीवर्धननजीकच्या गोंडघर गावातील ३ तरुण १९ एप्रिल रोजी सकाळी श्रीवर्धनच्या वेळास समुद्रकिना-यावर फिरायला गेले होते. हे तिघेही समुद्रात पोहण्यासाठी उतरले. या ३ तरुणांमध्ये दोघे जण सख्खे भाऊ होते. तिन्ही तरुणांना समुद्रात पोहताना पाण्याचा अंदाज आला नाही. लाटांनी समुद्रात खेचल्यामुळे तिघेही समुद्रात बुडाले. नाका-तोंडात पाणी जाऊन तिघांचाही मृत्यू झाला.

स्थानिक तरुण आणि वॉटर स्पोर्टस् चालकांच्या मदतीने बुडालेल्या या तिन्ही तरुणांचा शोध घेण्यात आला. तिघांनाही त्यांनी बाहेर काढले. या तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तरुणांच्या कुटुंबीयांना याची माहिती देण्यात आली आहे. एकाच गावातील ३ तरुणांचा मृत्यू झाल्यामुळे गोंडघर गावावर शोककळा पसरली आहे.

मयुरेश संतोष पाटील (वय २३ वर्षे), अवधूत संतोष पाटील (वय २६ वर्षे) या दोन सख्ख्या भावांचा मृतांमध्ये समावेश आहे. दोघेही श्रीवर्धन तालुक्यातील गोंडघर गावामध्ये राहणारे होते. हिमांशु पाटील (वय २१ वर्षे) याचा देखील मृत्यू झाला. हिमांशु नवी मुंबईतल्या ऐरोलीमध्ये रहात होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR