लातूर : प्रतिनिधी
महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेद्वारा संचलित श्री देशिकेंद्र विद्यालयाच्या तब्बल दहा विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळविले तर विद्यालयाचा एकूण निकाल ९९.४७ टक्के एवढा लागला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दहावी बोर्ड परीक्षेच्या निकालातील दबदबा कायम ठेवला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च २५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस या विद्यालयातील ७६५ विद्यार्थी सामोरे गेले. यापैकी तब्बल ७६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यात शर्वरी बंगाळे, वेदिका बोळेगावे, सुजल कडेकर, वैजनाथ मनगुरे, श्रेया मोरे, प्रेरणा पवार, पार्थ पेन्सलवार, वरद सानप, ऋषीकेश रासूरे व वैष्णवी पवार या दहा विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुण मिळविले तर ४९५ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, १६१ विद्यार्थी प्रथम श्रेणीत, ७८ विद्यार्थी द्वितीय श्रेणीत तर १७ विद्यार्थी तृतीय श्रेणीत उत्तीर्ण झाले व या निकालातील विद्यालयाचे वर्चस्व पुन्हा सिद्ध केले आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आदिनाथ सांगवे उपाध्यक्ष माधवराव पाटील चिंचोलीकर, सचिव माधवराव पाटील टाकळीकर, सहसचिव सुनिल मिटकरी, कोषाध्यक्ष विजयकुमारप्पा रेवडकर, कार्यकारी संचालक प्रदीप दिंडेगावे,संचालक बसवराज येरटे व सर्व संचालक,उपमुख्याध्यापक शिवानंद स्वामी, पर्यवेक्षक पुष्पा पाटील,मनोज दानाई,कल्पना देवगुंडे,विलास शेळके सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.