लातूर : प्रतिनिधी
लातूर शहरातील गांधी चौकातील श्री महालक्ष्मी मंदिराचा कलशारोहण सोहळा मंगळवार दि. २९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता काशी पीठाचे जगदगुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी व श्रीशैलम पीठाचे जगदगुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामी यांच्या अमृतहस्ते संपन्न होणार आहे. त्या निमित्त श्री महालक्ष्मी मंदिर कलशारोहण सोहळयानिमित्त सोमवारी सकाळी काढण्यात आलेल्या शोभायात्रेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी डॉ. शांतवीरलिंग शिवाचार्य महाराज औसा, चंद्रशेखर शिवाचार्य महाराज, माजलगाव, श्री महालक्ष्मी मंदिर कलशारोहण सोहळा समितीचे स्वागताध्यक्ष माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांसह महाराष्ट्र राज्य वीरशैव गवळी समाजाचे प्रदेशाध्यक्ष भटू बुद्धाजी नामागवळी, महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे सचिव अशोक मंडले, अशोक भाले, देवा अंजीरखाने, नारायण बहिरवाडे, सुरेश शहापूरकर, विजय लकडे, अनिल नायकू, प्रवीण हुंडीवाले, भालचंद्र हुच्चे, विनोद औंढेकर, सदाशिव आलमखाने यांसह मान्यवरांची उपस्थिती राहणार आहे.
तसेच रविवारी रात्री हभप. गुरुराज महाराज देगलूरकर यांचे सुश्राव्य किर्तनाने भाविकांना अक्षरश: मंत्रमुग्ध केले. मंदिराचा कलशारोहण सोहळा मंगळवार दि. २९ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० वाजता काशी पीठाचे जगदगुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी व श्रीशैलम पीठाचे जगदगुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांच्या अमृतहस्ते संपन्न होणार आहे.
या सोहळयाच्या यशस्वीतेसाठी राजकुमार झिपरे, मल्लिकार्जुन घुगरे, प्रकाश साठे, दत्ता झिपरे, माणिक आपुने, मन्मथप्पा हुच्चे, राम आपुने, काशिनाथ साठे, शंकर झिपरे, दिलीप झिपरे, मंगेश हुच्चे, अंकुश साठे, प्रकाश झिपरे, नागनाथ झिपरे, सोमनाथ कद्रे, राजू भास्कर, सिद्राम साठे संतोष साठे, शिवाजी झिपरे, लखन घुगरे यांसह गवळी समाजातील अनेक मान्यवरांनी परिश्रम घेतले.