लातूर : प्रतिनिधी
येथील सरस्वती कॉलनीतील श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात छत्रपती संभाजीनगर विभाग पदवीधर मतदार संघअंतर्गत पदवीधर मतदार नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी शेषराव मोहिते होते. प्रमुख पाहुणे म्हणून संस्थापक सचिव अजय जाधव, राष्ट्रवादी शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मदन धुमाळ, राष्ट्रावादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष अंकुश नाडे यांची उपस्थिती होती. यावेळी विद्यालयातील सर्व स्टॉप मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी १५१ नोंदणी फॉर्म आमदार विक्रम काळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी आमदार विक्रम काळे यांनी मनोगत व्यक्त करून मागील व विद्यमान शैक्षणिक वर्षातील कामाचा आढावा मांडला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रवीण घोरपडे यांनी केले तर आभार प्राचार्य कटके यांनी मानले.