27.3 C
Latur
Tuesday, December 24, 2024
Homeलातूरश्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानात विविध कार्यक्रम

श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानात विविध कार्यक्रम

अयोध्येतील प्रभु श्रीराम मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा सोहळा दि. २२ जानेवारी रोजी होणार आहे. त्यानिमित्त येथील ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानात दि. २१ व २२ जानेवारी रोजी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.  सर्व भारतीयांचे लक्ष लागून राहिलेल्या अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा निमित्ताने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर मंदिर अनोख्या विद्युत रोषणाईने उजळून निघाले आहे तसेच मुख्य गर्भगृह आणि सभामंडप येथे मनमोहक पुष्प सजावट केली जात आहे. देवस्थानच्या वतीने दि. २१ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजता महानगरपालिका प्रशासनाच्या सौजन्याने मंदिर आणि तीर्थकुंड परिसर स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच राम सीता वाटिका हा अभिनव उपक्रम राबवित रामफळ आणि सीताफळ वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.
दि. २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजलेपासून भव्य स्क्रीनवर सोहळ्याचे थेट प्रेक्षेपण केले जाणार असून सकाळी ११.३० वाजता यज्ञ प्रारंभ केला जाईल, दुपारी १२.३० वाजता रामरक्षा पाठ हजारो भाविकांच्या उपस्थित करण्यात येणार आहे. तसेच मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपल्यानंतर श्रीराम प्रतिमेची आरती करण्यात येवून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २२ जानेवारी रोजी संध्याकाळी श्री राम भजन संध्येस प्रारंभ होईल, आणि ७:४५ वाजता श्री सिध्देश्वराची महाआरती होणार आहे. तसेच रात्री ९:३० वाजता ११ हजार दिवे प्रज्वलित करुन दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या धार्मिक सोहळ्यात सर्व लातूरकरांनी सहपरिवार सहभागी व्हावे, असे आवाहन ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थान प्रशासक, विश्वस्त मंडळ, आणि भक्त्त परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR