18.1 C
Latur
Monday, January 6, 2025
Homeमनोरंजनश्रेयस तळपदेला हृदयविकाराचा धक्का

श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा धक्का

मुंबई : अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी संध्याकाळी मुंबईतील शूटिंग संपल्यानंतर अचानक हृदयविकाराचा झटका आला. यानंतर श्रेयसला त्वरीत अंधेरी पश्चिम येथील बेलेव् ू रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याची अँजिओप्लास्टी करण्यात आली.

श्रेयस तळपदे त्याचा आगामी चित्रपट वेलकम टू द जंगलचे शूटिंग करत होता. शूटिंग संपल्यानंतर तो घरी परतला. त्यावेळी त्याला अचानक हृदयविकाराचा धक्का बसला. त्यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. अवघ्या ४७ व्या वर्षी श्रेयस तळपदेला हृदयविकारचा झटका बसला.

अँजिओप्लास्टीनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. मात्र रुग्णालयाने सध्या कोणतेही वैद्यकीय बुलेटिन जारी केलेले नाही. श्रेयस तळपदे मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील नावाजलेला अभिनेता आहे. त्याने आतापर्यंत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम केले.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR