24.2 C
Latur
Monday, July 1, 2024
Homeराष्ट्रीयषडयंत्राचा खेळ संपला, आमचा हेमंत आला

षडयंत्राचा खेळ संपला, आमचा हेमंत आला

 सुटकेनंतर सोरेनचे लागले पोस्टर

रांची : झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झामुमोचे नेते हेमंत सोरेन यांना काल झारखंड उच्च न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ रांचीमध्ये पोस्टर लावण्यात आले आहेत. या पोस्टरमध्ये ‘षडयंत्रांचा खेळ संपला, आमचा हेमंत आला, असा मजकूर लिहिलेला आहे. यासोबत हेमंत सोरेन यांचा फोटोही लावण्यात आला आहे. हेमंत सोरेन यांच्या सुटकेने झामुमो कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह वाढत आहे.

दरम्यान, जामिनावर सुटल्यानंतर झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन म्हणाले की, मी गेल्या ५ महिन्यांनंतर तुरुंगातून बाहेर आलो आहे. गेले ५ महिने झारखंडसाठी चिंताजनक होते. मी का तुरुंगात गेलो हे संपूर्ण देशाला माहीत आहे. अखेर न्यायालयाने मला न्याय दिला, त्यामुळे मी आज तुरुंगाबाहेर आहे, मी न्यायालयाचा आदर करतो, असे सोरेन म्हणाले. हेमंत सोरेन यांना या वर्षी ३१ जानेवारी रोजी कथित जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली होती. यानंतर शुक्रवारी उच्च न्यायालयाने सोरेन यांना जामीन मंजूर केला आहे. जामीन मिळाल्यानंतर सायंकाळी त्यांची तुरुंगातून सुटका झाली. यानंतर त्यांनी पहिल्यांदा वडील शिबू सोरेन यांची भेट घेतली. यानंतर पक्षाच्या नेत्यांची औपचारिक बैठक झाली.

महुआ मांझी यांनी भाजपवर निशाणा साधला
दरम्यान, जेएमएमचे खासदार महुआ मांझी यांनी आज म्हटले की, हेमंत सोरेन हे झारखंडमधील अतिशय लोकप्रिय नेते आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांची अनुपस्थिती असतानाही जनतेने आम्हाला साथ दिली. तुरुंगातून सुटल्यानंतर भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. लोकप्रिय नेते हेमंत सोरेन यांना अटक करून मते मिळवण्याचा भाजपचा डाव फसला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR