संगमनेर : प्रतिनिधी
विविध सण व उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या शांतता समितीच्या बैठकीत मिरवणुकीच्या परवानगीवरून शिवसेना शिंदे गट व ठाकरे गटात जोरदार राडा झाला. कार्यकर्ते एकमेकांवर धावून गेले. अखेर पोलिस प्रशासनाने यात हस्तक्षेप करत दोघांनाही सज्जड दम देत कायद्याच्या भाषेत सुनावल्यानंतर हा वाद निवळला. शांतता समितीच्या बैठकीत शिवजयंती मिरवणुकीसाठी दोन्ही गटांना परवानगी देण्यात आली.
गेल्या दहा दिवसांपासून शहरात निर्माण झालेल्या कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती, तसेच आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी शांतता समितीची शनिवारी (दि. १५) सकाळी साडेअकरा वाजता यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनात बैठक आयोजित करण्यात आली होती.