16.9 C
Latur
Wednesday, January 22, 2025
Homeलातूरसंचार साथी अ‍ॅप आता मोबाईलवर

संचार साथी अ‍ॅप आता मोबाईलवर

लातूर : प्रतिनिधी
देशभरातील सामान्य लोकांना सायबर घोटाळ्यापासून संरक्षण मिळावे यासाठी डिपार्टमेंट ऑफ टेलिकॉम (डीओटी) आणि बीएसएनएल (भारत संचार निगम लि.) च्या वतीने आता मोबाईलवर संचार सारथी हे अ‍ॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यामुळे नागरीकांना फसवणूक टाळणे आता शक्य होणार आहे.
महाराष्ट्र राज्यात जवळपास १५ कोटी ८८ लाख मोबाईल ग्राहक आहेत. मात्र या पैकी बहुतांश मोबाईलधारकांना फसवणूक करणारे सतत कॉल येत आहेत. त्यामुळे ग्राहक हैराण आहेत. खोटे, फसवणुकीचे कॉल केल्याप्रकरणी राज्यात एकूण १ लाख ९२ हजार ७४४ मोबईल कनेक्शन बंद करण्यात आले. तर २ हजार ३१३ हॅन्डसेट केले जप्त करण्यात आले आहेत. असे असले तरी अजून ग्रहाकांना फसवणूक करणारे सतत कॉल येत आहेत. त्यामुळे शासनाकडून मोठ्या प्रमाणात जणजागृत केली जात आहे.
तसेच या प्रकराची दखल घेत सरकारने संचार साथी हे अ‍ॅप मे २०२३ मध्ये सुरू केले. मात्र ते संकेतस्थळावर उपलब्ध होते. आता हे अ‍ॅप मोबाईलवर दि. १७ जानेवारी रोजी पासून अधिकृतपणे उपलब्ध झाले आहे. त्यामुळे ते मोबाईलमध्ये डाऊनलोड करून ग्राहकांनी आपली फसवणूक टाळणे शक्य होेणार आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR