21.3 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeसोलापूरसंचालकांच्या वकिलांनी घेतला चौकशी अधिकाऱ्यांचा उलट तपास

संचालकांच्या वकिलांनी घेतला चौकशी अधिकाऱ्यांचा उलट तपास

सोलापूर : बिगर शेतीसाठी कर्ज वाटप केल्याने बँकेचे नुकसान झाले नसताना नुकसान झाल्याचा चुकीचा अहवाल दिला. विभागीय सहनिबंधकांनी दिलेले मुद्दे सोडून चौकशी केली आदी मुद्द्यांवर संचालकांच्या वकिलांनी डीसीसी बँकेच्या ८३ अन्वये चौकशी अधिकाऱ्यांचा उलट तपास घेतला.

८८ चे चौकशी अधिकारी किशोर तोष्णीवाल यांच्यासमोर चंद्रकांत टिकुळे व बँकेचे माजी अधिकारी विलास देसाई यांनी उत्तरे दिली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे बेकायदेशीर कर्ज वाटप करून नुकसान केल्याचा ८३ अन्वये अहवाल प्रादेशिक उपायुक्त (वस्त्रोद्योग) चंद्रकांत टिकुळे यांनी दिला होता.

शरद सहकारी सूत गिरणी नान्नज, उत्तर सोलापूर तालुका खरेदी-विक्री संघ, घृष्णेश्वर सहकारी साखर कारखाना, निनाईदेवी सहकारी साखर कारखान्यांना कर्ज देऊ नये अशी बँकेची कार्यालयीन टिप्पणी नव्हती, असे अ‍ॅड. प्रकाशराव पाटील यांच्या उलट तपासात ८३ चे चौकशी अधिकारी चंद्रकांत टिकुळे यांनी होय असे उत्तर दिले. त्यावर संचालक व कर्मचारी अशा ६७ लोकांना जबाबदार धरण्यात आले आहे.

८३ च्या अहवालातील मुद्द्यांवर संचालकांच्या वकिलांनी टिकुळे यांचा उलट तपास घेतला. मृत संचालक माजी आमदार चांगोजीराव देशमुख तसेच माजी आमदार धनाजी साठे, सुजाता अंत्रोळीकर, सुनीता बागल, सेवक संचालक सुभाष भोसले,
शिवाजी दास व स्वतः प्रकाश पाटील यांच्यावतीने अ‍ॅड. प्रकाश पाटील व भैरू वाघमारे यांच्या वतीने अ‍ॅड. धनंजय पवार यांनी उलट तपासात प्रश्नांची सरबत्ती केली. मुदतीनंतर चौकशी केली, अधिकाराचा दुरुपयोग करून चौकशी केली, विभागीय सहनिबंधकांनी १५ फेब्रुवारी २०२२ रोजी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली असल्याने टिकुळे यांना१४ फेब्रुवारी २०१७ अगोदरच्या कर्ज वाटपाची चौकशी करता येत नसताना बेकायदेशीर चौकशी केली, ज्या कर्ज प्रकरणांची चौकशी केली त्या प्रकरणांचे सहकार न्यायालयाने हुकूमनामे केले होते,

संचालकांना नोटीस न देता एकतर्फी चौकशी केली, २०१४ मध्ये ज्या मुद्द्यांवर तत्कालीन जिल्हा उपनिबंधक बिभीषण लावंड यांनी चौकशी केली होती त्याच मुद्द्यांवर आपण चौकशी केली, बँकेचे पोटनियम न पाहता चौकशी केली, एनपीएची चौकशी चुकीची केली. ३९ युनिटचा अहवाल असताना १८ युनिटची खोटी चौकशी केली, मतदान व कर्जवाटपाचे अधिकार नसताना सेवक संचालकांना चुकीने जबाबदार धरले आदी मुद्द्यांवर संचालकांचे वकील प्रकाश पाटील व धनंजय पवार यांनी उलट तपास घेतला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR