30.9 C
Latur
Tuesday, June 3, 2025
Homeलातूरसंजीवनी अ‍ॅक्सिडेंट न्युरो केअर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन

संजीवनी अ‍ॅक्सिडेंट न्युरो केअर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन

निलंगा : प्रतिनिधी
लातूर येथे बालरोगतज्ञ डॉ. ज्ञानेश्वर कदम व नुरो सर्जन डॉ संगीता कदम यांचे ३१ बेडचे संजीवनी अ‍ॅक्सिडेंट न्युरो केअर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे दि. १ जून रोजी लातूर येथील जुने लहाने हॉस्पिटल सावेवाडी दीनानाथ नगर येथे उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत कृष्णा मेडिकल कॉलेज कराडचे न्युरो सर्जरीचे माजी विभाग प्रमुख डॉ. विनायक राजे यांच्या हस्ते पार पडला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. विठ्ठल लहाने हे उपस्थित होते. यावेळी सी पी एस मुंबईचे माजी अध्यक्ष डॉ गिरीश मैंदरकर, डॉ. संतोष कदम, डॉ. रमेश भराटे, डॉ. ज्योती सुळ, डॉ. एन पी जमादार, डॉ. संतोष कवठाळे, डॉ. संजय कदम, डॉ. मनोज कदम, सुधाकर कदम, बाबुराव बिरादार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालरोगतज्ञ डॉ ज्ञानेश्वर कदम व न्यूरो सर्जन डॉ संगीता कदम यांनी मेंदूमधील विविध आजार त्यावर लागलीच उपाययोजना काय करावी याबाबत सविस्तर माहिती सांगितली. तर सूत्रसंचलन प्रा. सतीश हानेगावे व आभार संजय कदम यांनी मानले.
यावेळी मान्यवरांच्या वतीने लातूर येथील श्री व सौ डॉ. कदम यांच्या संजीवनी अ‍ॅक्सिडेंट न्युरो केअर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी लातूर जिल्ह्यातील अनेक डॉक्टर्स उपस्थित होते. यात माजी आमदार वैजनाथ शिंदे, उस्मानाबाद जनता बँकेचे अध्यक्ष नगदे, लातूर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष पंडितराव धुमाळ, व संतोष देशमुख, व्यंकट बेंद्रे, औरादचे माजी सरपंच मोहनराव भंडारे, निलंगा कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती लालासाहेब देशमुख, नागनाथराव बागदुरे, सुभाषराव मुळे, संजय सावरीकर, रमेश बगदुरे, राजाप्पा वलांडे, राजा पाटील, अशोक कत्ते, रमेश थेटे, तालुका आरोग्य अधिकारी प्रदीपकुमार जाधव, पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी, बालाजी भंडारे, संतोष स्वामी, सतीश देवणे, रमेश मदरसे, नुर पटेल, गोरख नवाडे, शंकर सोनार, असद पठाण, डॉ. एस. एस. शिंदे, डॉ. उध्दव जाधव, डॉ. सचिन बसुदे, डॉ. अभिजत लोखंडे, डॉ. सुनील ढोबळे आदीसह डॉक्टर, वकील, शिक्षक, व्यापारी व शिक्षक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.तसेच निलंगा ,औराद शाहाजानी , तगरखेडा,सावरी पंचक्रोशीतील आप्तजन व सगेसोयरे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR