22.1 C
Latur
Sunday, September 8, 2024
Homeलातूरसंत्र्यांची आवक वाढल्याने दरात घसरण

संत्र्यांची आवक वाढल्याने दरात घसरण

लातूर : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून शहरातील फ्रुट मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर संत्र्यांची आवक वाढली आहे. नागपूरच्या संत्रीला ग्राहकांची पसंती मिळत आहे त्यामुळे आवक वाढली आहे. दरम्यान, अचानक आवक वाढल्याने संत्रीच्या दरात अल्पशी घसरण झाली आहे. राजस्थानसह पंजाबमधील किनोमधूनदेखील संत्रीची आवक शहरातील बाजारपेठेत होत आहे. राजस्थानमधून जरी संत्रीची आवक होत असली तरी नागपुरी गोड संत्रीला ग्राहकांची पसंती मिळत आहे.

शहरातील फळ मार्केटमध्ये दिवसाला जवळपास एक हजार पेटी संत्रीची आवक होत आहे. यामध्ये नागपूर, अहमदनगर आणि राजस्थानमधून संत्रा शहरातील मार्केटमध्ये दाखल होत आहे. येणा-या आवकपैकी ६० टक्के आवक ही नागपूरमधून होत आहे. सध्या किरकोळ बाजारात संत्रीला किलोला ४५ ते ५० रुपये किलो भाव असल्याचे व्यापारी तुळशीराम घोने यांनी ‘एकमत’शी बोलताना सांगितले आहे. शहरातील फळ बाजारात नागपूरची संत्री मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल झाली आहे. गेल्या १५ दिवसांपासून शहर व परिसरातील प्रत्येक हातगाडीवर संत्रीची विक्री होताना दिसत आहे. येथील घाऊक बाजारात मोठ्या प्रमाणात संत्री विकली जाते. शहरातील किरकोळ बाजारात संत्री ५० रुपये किलो दराने विक्री होत आहे. सुरुवातीला बाजारात २०० ते ३०० पेटी असणारी आवक शनिवारी वाढली असून ती ३००० पेटीपर्यंत पोहोचली आहे. बाजार समितीमध्ये शनिवारी निघालेल्या सौद्यात एका पेटीचा दर ३०० ते ८०० रुपये झाला असून सरासरी दर ५०० रुपये निघाला आहे मात्र, किरकोळ बाजारपेठेत संत्रीची विक्री ४५ ते ५० रुपये किलोने होत आहे.

ऑक्टोबरच्या मध्यावर संत्रीची आवक बाजार समितीमध्ये होते मात्र, सुरुवातीला पावसाने दिलेली ओढ आणि संत्री काढणीच्या वेळी परतीच्या पावसाने झोडपल्यामुळे संत्रीची आवक झाली नव्हती. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासून नागपूर व नाशिक येथील संत्री बाजार समितीमध्ये दाखल झाली होती. सुरुवातीला २०० ते ३०० पेटी आवक असताना सरासरी भाव ७०० रुपये मिळत होता मात्र, शनिवारी बाजार समितीमध्ये ३००० पेटी संत्रीची आवक झाली. याचा सौदा काढल्यानंतर सरासरी पेटीला ५०० रुपयांचा दर मिळाला आहे. बाजारात नवीनच दाखल झालेली संत्री खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होताना दिसून येत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR