22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeलातूरसंत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना चेअरमनपदी शाम भोसले तर व्हाईस चेअरमनपदी सचिन...

संत शिरोमणी मारुती महाराज सहकारी साखर कारखाना चेअरमनपदी शाम भोसले तर व्हाईस चेअरमनपदी सचिन पाटील यांची बिनविरोध निवड

औसा : प्रतिनिधी
मांजरा परिवारातील एक साखर कारखाना म्हणून गौरवला जात असलेल्या औसा तालुक्यातील बेलकुंड येथील संत शिरोमणी मारुती महाराज शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी शाम भोसले तर व्हाईस चेअरमनपदी सचिन पाटील यांची निवड झाली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक बदनाळे  यांनी जाहीर केले आहे.
नुकतीच संत शिरोमणी मारूती महाराज  शेतकरी सहकारी साखर कारखाना निवडणूक झाली. यामध्ये संचालक पदासाठीच्या जवळपास सर्व जागा बिनविरोध निवडून आल्या होत्या. लोकनेते विलासराव देशमुख यांच्या कार्यातून प्रेरणा घेत माजी मंत्री तथा मांजरा परिवाराचे मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या नेतृत्वाखाली संत शिरोमणी मारुती महाराज शेतकरी सहकारी साखर कारखाना यशस्वीपणे वाटचाल करत असून आपल्या कार्यातून जो विश्वास कारखान्याने शेतक-यांच्या मनात निर्माण केला त्या विश्वासाच्या बळावर पुनश्च एकदा हा कारखाना चालवण्यासाठी मांजरा परिवाच्या हातात शेतकरी सभासदांनी दिला आहे. शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून समविचारी लोकांना सोबत घेऊन या कारखान्याच्या नुकत्याच निवडणूका पार पडल्या, त्यानंतर चेअरमन व व्हाईस चेअरमन पदाच्या निवडीसाठी निरिक्षक म्हणून राज्य साखर संघाचे सदस्य आबासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेस समन्वयक  सचिन दाताळ यांची नियुक्त्ती नेतृत्वाने केली होती. त्यानुसार दि. २३ जानेवारी रोजी सदरील पदासाठीच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत.
सहकार क्षेत्रात मोठ्या अभिमानाने गौरवले जात असलेल्या मांजरा परिवारातील साखर कारखान्याचा एक घटक असलेल्या संत शिरोमणी मारूती महाराज शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व व्हाईस चेअरमनपदी झालेली आपली निवड ही अभिमानाची गोष्ट असून ही संधी उपलब्ध करुन दिल्या बद्दल  माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख, आमदार अभिमन्यू पवार, माजी आमदार दिनकर माने यांचे आभार व्यक्त्त करुन नेत्यांनी जो विश्वास आपल्या वर टाकला आहे तो सार्थ ठरवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करत राहू असे आश्वासन नुतन चेअरमन शाम भोसले, व्हाईस चेअरमन सचिन पाटील यांनी दिले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR