22.2 C
Latur
Tuesday, February 25, 2025
Homeपरभणीसंदेश सौंगडे, हर्ष भालेराव यांचे राष्ट्रीय स्पर्धेत यश

संदेश सौंगडे, हर्ष भालेराव यांचे राष्ट्रीय स्पर्धेत यश

परभणी : महाराष्ट्र अबॅकस असोसिएशनने पुणे येथे राष्ट्रीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेसाठी १८० मार्कांसाठी १० मिनीटांचा वेळ दिला होता.

या स्पर्धेत संदेश निता शरद सौंगडे, हर्ष स्रेहा शरद भालेराव या विद्यार्थ्यांनी १० मिनीटात १६०-१५० प्रश्न सोडवून राष्ट्रीय स्तरावर ज्युनियर लेवलमध्ये तिसरा क्रमांक पटकावला. स्पर्धेचा सराव आणि मार्गदर्शन मागील एक महिन्यांपासून के.बी. अबॅकसचे डायरेक्टर इंजि. सुमित सौंदडकर व प्रा. सुजा सौंदडकर यांनी केले. विद्यार्थी व पालकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR