नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताजवळ पाकिस्तानात आत घुसून अचूक हल्ला करण्याची ताकद आहे. मग ते रावलपिंडी असो वा खैबर पख्तूनख्वा अथवा कुठलाही भाग असेल अशा शब्दात भारतीय वायू सेनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल सुमेर इवान डी कुन्हा यांनी सैन्याच्या क्षमतेवर भाष्य केले आहे. संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये आहे जर पाकिस्तानी सैन्याने त्यांचे मुख्यालय रावलपिंडीहून केपीकेला शिफ्ट केले तरीही त्यांना लपायला जागा शोधावी लागेल असा इशारा त्यांनी दिला आहे.
भारताच्या सैन्याने आपला विचार बदलला आहे. आता आम्ही सहन करत नाही तर उलट अचूक वेळी योग्य ठिकाणी प्रत्युत्तर देण्याचे धोरण अवलंबतो. जोपर्यंत सीमा पार होत नाही तोपर्यंत आम्ही सहन करतो, परंतु रेषा पार केली तर आम्ही निर्णायक कार्यवाही करतो. या रणनीतीत भारताने जगालाही संदेश दिला आहे. आता यापुढे दहशतवादाविरोधात बचावात्मक नाही तर आक्रमक पवित्रा घेतला जाणार आहे असं लेफ्टनंट जनरल डी कुन्हा यांनी सांगितले.
ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताने स्वदेशी तंत्रज्ञान आणि सैन्य तुकड्यांमध्ये समन्वय साधला. भारतीय सैन्याने ड्रोन डिटेक्शन आणि इंटरसेप्शन सिस्टमने शत्रूचे हल्ले परतवून लावले. लॉन्ग रेंज मिसाईलने दहशतवादी तळांना कुठल्याही नागरी ढाच्याला नुकसान न पोहचवता यूनिफाइड कमान संरचनेंतर्गत वायूसेना, लष्कर आणि गुप्तचर यंत्रणांनी एकत्रित काम केले. आम्ही केवळ सीमेचे रक्षण केले नाही तर छावण्या, नागरीक क्षेत्र आणि आमच्या जवानांच्या कुटुंबालाही सुरक्षित ठेवले. हाच आमचा विजय आहे असं लेफ्टनंट जनरल डी कुन्हा यांनी म्हटले.