सोलापूर : २३ मार्च १९३१ या दिवशी सशस्त्र क्रांती लढा उभारून ब्रिटिशांना दणका देणारे क्रांतीवीर शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू या महान सेनानींना ब्रिटिश सरकारने फाशीची शिक्षा दिली होती. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील सर्वोच्च त्याग करणाऱ्या या क्रांतीवीरांना प्रतिवर्षाप्रमाणे संभाजी आरमारच्यावतीने मानवंदना देण्यात आली. भारत माता की जय, वंदे मातरम इन्कलाब जिंदाबाद शहीद जवान अमर रहे या जयघोषात संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून शहीदांना अभिवादन करण्यात आले.
यावेळी श्रीकांत डांगे म्हणाले, केवळ सत्याग्रहाच्या मार्गाने देश स्वतंत्र झाला नसून चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वाखाली शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांच्यासारख्या असंख्य जिगरबाज क्रांतिवीरांच्या लढ्याचा धसका ब्रिटिशांनी घेतला होता. त्यामुळेच हा देश सोडून ब्रिटिशांना जावे लागेल. या सर्वोच्च बलिदानाचे स्मरण आणि प्रेरणा प्रत्येक
भारतीयाने काळजात जपून ठेवली पाहिजे आणि त्या राष्ट्र निर्माणाच्या मार्गाने वाटचाल केली पाहिजे असे प्रतिपादन केले.
यावेळी संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे, उपाध्यक्ष शशिकांत शिंदे, जिल्हाप्रमुख अनंतराव नीळ, शहरप्रमुख सागर ढगे, शिक्षक संघटनेचे अजिंक्य पाटील, अर्जुन शिवसिंगवाले, जिल्हा संघटक अमित कदम, उपशहरप्रमुख रेवण कोळी, राज जगताप, अविनाश विटकर, मल्लिकार्जुन पोतदार, द्वारकेश बबलादीकर, संतोष कदम, रोहन तपासे, गिरीश जवळकर, आकाश भोसले, निहाल शिवसिंगवाले, प्रवीण मोरे, सचिन लंगाळे, संजय मस्के, मोहन येडलेलू, जनार्दन मदले, उदय राजपूत, बाळासाहेब वाघमोडे उपस्थित होते.