लातूर : प्रतिनिधी
शहरातील संविधान चौकात एका चार चाकीतून आलेल्या अनोळखी पत्रकाराने अमीर पठाण या तरुणास तु काश्मिरहून आलास का? पाकिस्तानचा आहेस का? म्हणून त्याला अवघड ठिकाणी मारहाण करून मारहाणीचे व्हीडोओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याने सदरील तरुणाने राहत्या घरात आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी दाखल गुन्ह्यातील संशयीत आरोपीने अटकपुर्व जामीनसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर दि. १५ व १६ मे असे दोन दिवस सुनावणी झाली. संशयीत आरोपीची अटकपूर्व जामीन होण्यास फिर्यादीच्या वकीलाने तीव्र विरोधी झाला. आता पुढील सुनावणी २० मे रोजी ठेवण्यात आली आहे.
सदर प्रकरणी येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्या दिवसापासून आजतागायत पोलीस संशीत आरोपीचा व गुन्ह्यातील चार चाकी गाडीचा शोध घेत आहेत. परंतु, यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. दरम्यान संशयीत आरोपीने अटकपुर्व जामीनसाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर जिल्हा न्यायालय तीसरे न्यासाधीशांसमोर सलग दोन दिवस सुनावणी झाली. फिर्यादीच्या वकीलाने संशयीत आरोपीच्या अकटपुर्व जामीनला तीव्र विरोधी केला. दरम्यान संशयीत आरोपीच्या वकीलाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली आहे. त्यामुळे फिर्यादी, सरकारी वकील व पोलिसांचे म्हणणे काय? यासाठी दि. २० मे ही तारीख देण्यात आली आहे.