लातूर : प्रतिनिधी
जिल्ह्यात मागील १० ते १२ दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी रिमझिम पावसामुळे शेतकरी पुन्हा संकटात सापडला आहे. शेकडो हेक्टरवरील भाजीपाला पावसामुळे खराब झाल्याने बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक पुन्हा घटली आहे. त्यामुळे रोजच्या जेवणातल्या भाज्यांचे दर गगनाला भिडण्यास सुरूवात झाली आहे. यात सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. गेल्या एक महिन्याच्या तुलनेत सर्व भाज्यांचे दरात चागलीच वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.
मागील काहि दिवसापूर्वी ढगाळ वातावरणासह लातूर जिल्ह्यातील विविध भागात अवकाळी पाऊस पडल्याने त्याचा थेट परिणाम भाजीपाल्याच्या उत्पन्नावर झाला आहे. पावसामुळे शेतातील भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीत येणारी भाजीपाल्याची आवक मागील काही दिवसापासून चांगलीच घटल्याचे दिसून येत आहे. शहरातील महात्मा फुले बाजार समितीत शनिवारी ३९६ किंव्टलची आवक झाली आहे. जिल्ह्याभरात पडलेल्या अवकाळी पावसामुळे ग्रामीन भागातून बाजारात दाखल होण्या-या पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे शहरातील किरकोळ बाजारात भाजीपाल्याच्या दरात जवळपास १० टक्क्यांनी वाढ झाली असून, काही दिवसानंतर सर्वच पालेभाज्यांचे दर चढेच राहतील अशी शक्यता व्यापारी वर्गाने वर्तवली आहे. शहरातील घाऊक बाजारपेठेत भाजीपाल्यांच्या दरात मागील पंधरा दिवसापासून अल्पक्ष वाढ झाली असल्याचे व्यापारी मिणाझ बागवान यांनी सागीतले आहे. आवकाळी पाऊसामुळे जिल्ह्यातील पालेभाज्यांचे पिक घेणारा शेतकरी संकटात सापडला आहे. शहरातील महात्मा फुले कृषी उत्पन्न बाजार समितीत शनिवारी ३९६ किंव्टलची आवक झाली असून शहरातील महात्मा फुले भाजी मंडईत येणा-या भाजीपाल्याची आवकही प्रती दहा किलोप्रमाणे भाव मिळाला आहे.
यात वागें १२ किंव्टल आवक होवून १५० रूपयांचा दर मिळाला, भेंडी ८ किंव्टल आवक होवून २१० रूपयांचा दर मिळाला, पत्ता गोभी २८ किंव्टल आवक होवून १२० रूपयांचा दर मिळाला, फुल गोभी ४९ किंव्टल आवक होवून २३० रूपयांचा दर मिळाला, दोडका १० किंव्टल आवक होवून ४०० रूपयांचा दर मिळाला, टमाटे गावराण ६१ किंव्टल आवक होवून १२० रूपयांचा दर मिळाला, वैशाली टमाटे ७२ किंव्टल आवक होवून १२० रूपयांचा दर मिळाला, गवार १५ किंव्टल आवक होवून ४०० रूपयांचा दर मिळाला, पालक १ किंव्टल आवक होवून १२० रूपयांचा दर मिळाला, शेपू १ किंव्टल आवक होवून २०० रूपयांचा दर मिळाला, भोपळा १५ किंव्टल आवक होवून १५० रूपयांचा दर मिळाला, कोथिंबीर २९ किंव्टल आवक होवून २२० रूपयांचा दर मिळाला, हिरवी मिरची ३४ किंव्टल आवक होवून ४०० रूपयांचा दर मिळाला, वैशाली मिरची १२ किंव्टल आवक होवून ४०० रूपयांचा दर मिळाला, शेवगा १० किंव्टल आवक होवून ४०० रूपयांचा दर मिळाला, मेथी ७ किंव्टल आवक होवून १५०० रूपयांना १०० नगाचा दर मिळाला, कांदापात २ किंव्टल आवक होवून १२०० रूपयांचा १०० नगाचा दर मिळाला, लिंबु ३ किंव्टल आवक होवून ४०० रूपयांचा दर मिळाला, काकडी ७ किंव्टल आवक होवून २०० रूपयांचा दर मिळाला आहे. कारले १४ किंव्टल आवक होवून ३४० रूपयांचा दर मिळाला, भुयमुगाच्या शेंगा १३ किंव्टल आवक होवून ४०० रूपयांचा दर मिळाला आहे.