26 C
Latur
Sunday, March 9, 2025
Homeमहाराष्ट्रसतीश भोसले भाजपचा कार्यकर्ता नाही; भाजपचे स्पष्टीकरण

सतीश भोसले भाजपचा कार्यकर्ता नाही; भाजपचे स्पष्टीकरण

बीड : प्रतिनिधी
भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. सतीश भोसलेनी तत्कालीन भाजपचे भटके- विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांना जातीची खोटी माहिती सांगून भाजप भटक्या विमुक्त युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष पद घेतले होते परंतु २०२१ सालीच त्याची पक्षातून हकलपट्टी करण्यात आल्याचे स्पष्टीकरण भाजपने दिले आहे.

दरम्यान, भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसले उर्फ खोक्या याने शिरूर तालुक्यातील बावी गावचे रहिवासी असलेल्या बाप-लेकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ समाज माध्यमावर व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली होती. या घटनेनंतर खोक्या चांगलाच चर्चेत आला आहे. आता त्याचे एक-एक कारनामे पुढे येत आहेत.

वनविभागाच्या पथकाकडून त्याच्या घराची झडती घेण्यात आली. त्याच्या घरातून जनावरांचे सुकलेले मांस आणि शिकारीसाठी वापरत असलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यानंतर आता खोक्याचा आणखी एक कारनामा समोर आला आहे, जातीची खोटी माहिती सांगून सतीश भोसले याने भजपकडून पद मिळवल्याची माहिती समोर आली आहे.

सतीश भोसलेनी तत्कालीन भाजपचे भटके- विमुक्त आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार नरेंद्र पवार यांना जातीची खोटी माहिती सांगून भाजप भटक्या विमुक्त युवा आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष पद घेतले होते. सतीश भोसले हा आदिवासी समाजाचा कार्यकर्ता आहे, तो अनुसूचित जमातीमध्ये मोडतो, भटकायुक्त प्रवर्ग वेगळा आहे. तरीसुद्धा त्याने चुकीची माहिती सांगून भटक्या विमुक्त प्रवर्गातून पद घेतले होते. मला ते कळल्यानंतर २०२१ सालीच मी त्याची पदावरून हाकालपट्टी केली होती, असे भाजप भटके विमुक्त आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मण जाधव यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR