पुणे : प्रतिनिधी
पुण्यातील हॉटेल व्यावसायिक सतीश वाघ हत्याकांडात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसत आहेत. सतीश वाघ यांचेही बाहेर अनैतिक संबंध होते, असा धक्कादायक दावा त्यांची पत्नी आणि हत्येच्या कटातील आरोपी मोहिनी वाघ हिने तपासात केला आहे. दुसरा आरोपी अक्षय जावळकरला समोर बसवून मोहिनीची चौकशी सुरू झाली आहे.
सतीश वाघ माझाही गेल्या दहा वर्षांपासून शारीरिक आणि मानसिक छळ करत होते, हा सर्व त्रास अस झाला होता, असे मोहिनी म्हणाली. हत्येचे मुख्य आरोपी अक्षय जावळकर आणि मोहिनी वाघ यांची समोरासमोर चौकशी करायला पोलिसांनी सुरुवात केली आहे. यावेळी सतीश वाघ यांच्यावर मोहिनी वाघने छळ आणि अनैतिक संबंधांचे आरोप केले.
सहा महिन्यांपासून हत्येचा कट
धक्कादायक म्हणजे, मागील सहा महिन्यांपासून मोहिनी पती सतीश वाघ यांना संपवण्यासाठी प्लॅन करत असल्याचेही समोर आले आहे. आपल्या परिचयातील एका व्यक्तीकडे तिने सतीश यांना संपवण्यासाठी विचारणा देखील केली होती. अखेर अक्षय आणि मोहिनी यांनी प्लॅन करून सतीश वाघ यांना संपवले. अक्षयने पाच लाखांची सुपारी मारेक-यांना दिली होती.
सतीश वाघ यांचे ९ डिसेंबरला पहाटे साडेसहाच्या सुमारास अपहरण करण्यात आले होते. एका प्रत्यक्षदर्शीने ही घटना पाहून लगेच वाघ कुटुंबियांना याविषयी माहिती दिली. वाघ यांच्या अंगावर चाकूने ७२ वेळा वार करण्यात आले होते.