25.7 C
Latur
Friday, February 28, 2025
Homeलातूरसत्ताधारी माजी लोकप्रतिनिधीसमोर महसूल प्रशासनाचे ‘जी हुजूर’

सत्ताधारी माजी लोकप्रतिनिधीसमोर महसूल प्रशासनाचे ‘जी हुजूर’

लातूर : प्रतिनिधी
अभिनेता सैफ अली खानवरील झालेल्या हल्लयानंतर माजी खासदार तथा भाजपा नेते किरीट सोमय्या हे सातत्याने भारतात राहणा-या बांगलादेशी नागरीकांविरोधात आवाज उठवत आहेत तर महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात ते दौरा करून यासंबधी तोंडी व लेखी भुमिका मांडत आहेत. असे असतानाच ते शुक्रवारी याच कामी लातूर दौ-यावर आले होते. या दौ-यात ते लातूर तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार यांची भेट घेणार असल्याचे नियोजित असताना तहसीलदार व महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यांनी ‘जी हुजूर’ करत विश्रामगृहावर आयोजित त्यांच्या बैठकीला हजेरी लावल्याने जिल्ह्यात चर्चेला उधान आले आहे.
माजी खासदार तथा भाजपा नेते किरीट सोमय्या हे सातत्याने भारतात राहणा-या बांगलादेशी नागरीकांविरोधात आवाज उठवत आहेत तर महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यात ते दौरा करुन पुराव्यानिशी तोंडी व लेखी आवाज ही उठवत आहेत त्यांच्या या भुमिकेचे अनेकांकडून कौतूक ही केले जात आहे. असे असतानाच हीच भुमिका घेऊन किरीट सोमय्या हे शुक्रवार दि. २८ फेबु्रवारी रोजी सकाळी लातूर शहर दौ-यावर आले होते. त्यांच्या या दौ-यात ते सकाळी ९:३० वाजता लातूर तहसिल कार्यालयात तहसिलदार यांची बांगलादेशी नागरिकांच्या जन्म दाखला प्रमाणपत्र प्रकरणी भेट घेऊन आपली भुमिका मांडणार होते. त्यानंतर ते या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यास भेट देणार होते. तसेच किरीट सोमय्या यांना ‘झेड’ श्रेणी सुरक्षा व्यवस्था (केंद्र सरकार सीआयएसएफ) असल्याने खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाने लातूर तहसिल कार्यालय व शिवाजीनगर पोलीस परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.
असे असताना लातूर तहसिलदार व महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हे आपल्या लावाजाम्यासह किरीट सोमय्या यांनी आपल्या पक्ष पदाधिका-यासह विश्रामगृहावर आयोजित केलेल्या बैठकीसाठी हजेरी लावली. व तेथेच बांगलादेशी नागरीकांविरोधात त्यांनी उपस्थित केले म्हणने ऐकून घेत लवकरात लवकर याप्रकरणी दोषीवर कारवाई करू, असे अश्वासन ही दिले.  तसे किरीट सोय्या यांनी पत्रकारांशी शिवाजीनगर पोलीस ठाणेतून परभणी दौ-यावर रवाना होताना तसा खुलासा ही केला आहे.  मात्र सत्ताधारी पक्षाचा माजी लोक प्रतिनिधी आपले ग-हाणे माडण्यासाठी कार्यालयात येत असताना त्यांच्याच भेटीला व बैठकीला जाणा-या तहसिलदार व महसूल प्रशासनातील वरिष्ठ अधिका-यासह कर्मचा-यांनी केलेल्या ‘जी हुजूर’ ची चर्चा मात्र जिल्ह्यात अधिक होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR