लातूर : प्रतिनिधी
राज्यातील सत्ताधा-यांनी निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहिण योजना सारख्या विविध योजना राबवून सरकारचा पैसा लोकांना दिला. त्या अशा अनेक योजनांमुळे राज्यांत एकंदर कौल सत्ताधा-यांना मिळाला असून लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातून काँग्रेस उमेदवार आमदार धिरज देशमुख यांचा पराभव झालेला नाही तर केवळ आपणच कुठे तरी कमी पडलो, असे सांगून आपल्या उमेदवाराला १ लाख ५ हजार मतदान मिळालेले आहे.
मतदार संघातील पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मेहनतीने कार्य केले आहे. त्यामुळें आपण ना उमेद न होता आगामी काळात काँग्रेसच्या पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कार्य करावे, असे सांगून सत्ता असो वां नसो मात्र आम्ही लातूरकरांच्या सेवेसाठी बाभळगाव व आशियानाचे दारे खुली आहेत, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी येथे बोलताना व्यक्त केला. बुधवारी आशियाना निवासस्थानी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील मातंग समाजातील प्रमुख पदाधिकारी असलेल्या शिष्टमंडळाने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीतील केलेल्या कार्याची माहिती दिली त्यावेळीं ते बोलत होते.
लोकनेते विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सत्ताधारी पक्षाचे लोक विरोधी पक्षात असताना सर्वांचे काम करायची ही आठवण आजही मंत्रालयात टिकून आहे. त्यामुळे जनतेच्या सेवेसाठी मंत्रालयात कुणाचीही सत्ता असली तरीही लातूरच्या देशमुखांचे पत्र व एक फोन गेला तर लोकांची कामे होतात. त्यामुळे सत्ता नाही कामे होणार नाही, असे समजू नका तसेच आपल्या उमेदवाराला मतदारांनी १ लाख ५ हजार लोकांनी मतदान केले त्यांच्यासाठी व सर्वासाठी आगामी काळात सर्वांचे काम करु, असा विश्वास माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी व्यक्त केला आहे
यावेळी मातंग समाजातील अंगद वाघमारे सोनवती, डॉ दिनेश नवगिरे (मुरुड) अमोल देडे (गोदेगाव) आपा देडे (गोंदेगाव) राजेंद्र मस्के, जगण चव्हाण (मुरुड) सचिन कांबळे (तांदुळजा) राजाभाऊ प्रसाद आनंतवाड दिनेश ढोबळे (बोरी) शंकर शिंदे (भातांगळी) रसाळ (निवळी) रामलींग भडगे दिलीप भंडगे (चिंचोली ब ) दता देडे नितीन देडे (रामेगाव) संजय हजारे (भादा) संपत गायकवाड (काळमाथा) सुभाष गायकवाड (पोहरेगाव) कल्याण शाहिर (डिगोळ देशमुख) सिध्देश्वर गालफाडे (पानगाव) महादेव शिरसाठ (भंडारवाडी) सुभाष शिरसाठ (गोविंदनगर) परमेश्वर सुर्यवंशी तानाजी सुर्यवंशी (धवेली) नागनाथ डोंगरे (तळणी) प्रकाश वाघमारे (निवाडा)येथील लातुर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील मातंग समाजाच्या प्रमुख कार्यकर्त्याने माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख यांची भेट घेऊन यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.