चाकूर : प्रतिनिधी
जनतेच्या हक्कासाठी ही जिल्हा परिषद निवडणूक लढवित असून सत्तेसाठी नाही तर सेवेसाठी राजकारण असून शिक्षण, रस्ते , वीज आणि पाणी या मूलभूत सोयी सुविधांना प्राधान्य असेल, महिला सबलीकरण ते युवकांना रोजगार याला प्राधान्य देणार असून शासनाच्या सर्व योजना थेट जनतेपर्यत पोहचविणार असल्याचे प्रतिपादन भाजपाच्या रोहीणा गटातील उमेदवार सुप्रिया सुधाकर शिंगारे यांनी मतदारसंघातील विविध गावांमध्ये आयोजित कॉर्नर बैठक, सभेतून बोलताना केले.
बावलगाव, शेळगाव, संगाची वाडी, नागेशवाडी, गोविंदवाडी, रोहीणा, आटोळा, तिवटघाळ, तिवघाळ, तळघाळ, बनसावरगाव, भाटसांगवी, राचन्नावाडी आदी गावांमध्ये कॉर्नर बैठकाना आणि सभांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. रोहिणा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपाकडून सुप्रिया सुधाकर शिंगारे यांनी प्रचारात आघाडी घेतली असून या गटातील रोहीणा गणात पंचायत समीतीच्या भाजपाच्या अधिकृत उमेदवार पुजा रंजित डिघोळे आणि आटोळा पंचायत समितीचे भाजपचे अधिकृत उमेदवार महेश नारायण कांबळे हे निवडणूक रिंगणात असून त्यांनाही मतदारांचा पाठिंबा असल्याचे चित्र दिसून येत आहे.
सुप्रिया शिंगारे उच्चशिक्षित
सुप्रिया शिंगारे या घरणी येथील रहिवाशी असून, उच्चशिक्षित, माजी केंद्रीय मंत्री टी. एस. बाबा शृंगारे यांच्या नात सून आणि माजी खासदार सुधाकर शृंगारे यांच्या कन्या, या रोहिणा जिल्हा परिषदेच्या भाजपाच्या उमेदवार आहेत. त्या सिव्हील इंजिनियर असून यशस्वी महिला उद्योजक आहेत.

