39.2 C
Latur
Sunday, April 20, 2025
Homeराष्ट्रीयसत्य, धैर्याचा वारसा नेहरूंकडून मिळाला

सत्य, धैर्याचा वारसा नेहरूंकडून मिळाला

राहुल गांधी यांचे वक्तव्य
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
दडपशाहीचा प्रतिकार करण्याचा आणि धैर्याने स्वातंत्र्य मिळविण्याचा जवाहरलाल नेहरू यांचा भारतीयांसाठी सर्वांत मोठा वारसा आहे. त्यांच्याकडून सत्य आणि धैर्य मला वारशाने मिळाले, असे प्रतिपादन कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज केले.

कॉंग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी त्यांची मुलाखत घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यासंबंधीचा व्हीडीओ एक्सवर जारी केला आहे. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरूंनी आम्हाला राजकारण शिकविले नाही. त्यांनी आम्हाला भीतीचा सामना करायला आणि सत्यासाठी उभे राहण्यास शिकविले, असेही राहुल गांधी म्हणाले. शोध घेणे, प्रश्न विचारणे, कुतूहल राहणे हे नेहरूंचे विचार आहेत. आपल्या कुटुंबाच्या आठवणीबद्दल बोलताना राहुल गांधी यांनी त्यांच्या आजी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी नेहरूंच्या साहसांच्या आणि आनंदाच्या कथा सांगितल्या, याची आठवण त्यांनी करून दिली. जवाहरलाल नेहरू, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांची आठवण राहुल गांधी यांनी केली. या सर्वांनी भीतीशी मैत्री कशी करावी, हे शिकविले, असे ते म्हणाले.

बिल गेटस् आणि चेतराम मोचीसारख्या सामान्य माणसाशी समान भावनेने बोलतो. सर्वांना एकाच नजरेने पाहतो. खरे नेतृत्व म्हणजे नियंत्रण मिळविणे नसून, करुणेने राहणे असते. आजच्या भारतात, जिथे सत्य गैरसोयीचे झाले, मात्र, मी माझा मार्ग निवडला आहे. काहीही किंमत मोजावी लागली तरी मी सत्याच्या बाजूने उभा राहीन, असेही राहुल गांधी म्हणाले.

 

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR