35.2 C
Latur
Monday, March 10, 2025
Homeमहाराष्ट्रसभागृहात अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरुवात

सभागृहात अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरुवात

मुंबई : प्रतिनिधी
राज्याचा अर्थसंकल्प आज सादर होत आहे. राज्याचे अर्थमंत्री तसंच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभागृहात अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरुवात केलेली आहे. सर्वसामान्यांसाठी या अर्थसंकल्पात काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. सत्ता स्थापन झाल्यानंतर महायुती सरकारचा हा पहिला अर्थसंकल्प आहे.

लोकोपयोगी की लोकप्रिय घोषणा कशावर भर दिला जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अजित पवार यांनी विधान भवनात दाखल झाल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सभागृहात प्रवेश केला. त्यांनंतर आता राज्याचा अर्थसंकल्प सादर होण्यास सुरुवात झालेली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR