Homeलातूरसभापतीपदी पाटील, उपसभापती केंद्रे यांची निवड 

सभापतीपदी पाटील, उपसभापती केंद्रे यांची निवड 

अहमदपूर : प्रतिनिधी
जिल्हाधिकारी यांनी आदेशीत केल्यानुसार अहमदपूर पंचायत समिती येथील सभापती व उपसभापती यांची निवड करण्यासाठीची विशेष बैठक९ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराज सभागृह पंचायत समिती अहमदपूर येथे झाली.
   या विशेष सभेस एकूण १२ सदस्यांपैकी १० निर्वाचीत सदस्य उपस्थित होते. सभापती पदासाठी पाटील सुरज आणि उपसभापती पदासाठी श्रीमती केंद्रे आयोध्या यांचा प्रत्येकी एकच उमेदवारी अर्ज आल्याने पिठासीन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ.मंजुषा लटपटे यांनी पंचायत समिती अहमदपूर येथील सभापतीपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पाटील सुरज तसेच उपसभापती पदी भाजपाच्या श्रीमती. केंद्रे आयोध्या यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी केंद्रे सुरेखा संतोष, कासले सुलोचना, भोसले कृष्णराज, बोडके रवींद्र, गौड अंजली, गुट्टे सुधिर, मंडे सुरेखा, सरवदे कमल हे नूतन पंचायत समिती सदस्य उपस्थित होते.
       सभेचे पिठासीन अधिकारी म्हणुन डॉ.मंजुषा लटपटे उपविभागीय अधिकारी अहमदपूर यांनी तर सचिव म्हणून पंकज शेळके गट विकास अधिकारी यांनी कामकाज पाहीले. या विशेष सभेसाठी शैलेश जोशी सहा. प्रशासन अधिकारी,  राजेश सोनकांबळे कनिष्ठ. प्रशासन अधिकारी, रमाकांत पट्टेवाड वि.अ. (पं),  धनाजी सुळे वि.अ. (सां),  राजू तीर्थकर, आनंद पपशेटवार, प्रकाश कांबळे आदीनी परिश्रम घेतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR