टोकियो : वृत्तसंस्था
जपानच्या एका बेटाजवळ समुद्रात संशोधकांना पिरॅमिडसारखी रहस्यमयी आकृती सापडली आहे. ज्याच्या अभ्यासातून अशा गोष्टी बाहेर पडत आहेत, ज्याने आपल्या पृथ्वीचा इतिहासच बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जपानच्या रायुक्यू बेटावर पुरातन २४.९९ मीटरची रचना सापडली असून त्याला चोनागुनी मॉन्यूमेंट म्हटले जात आहे. आत समुद्राच्या खोलवर जर अशी संरचना सापडत असेल तर आपण पुरातन संस्कृतीला किती हलक्यात घेतले होते हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे या पिरॅमिड सदृश्य बांधकामाकडे दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
भर समुद्रात सापडलेली हे मानव निर्मित बांधकाम पाय-यावाल्या पिरॅमिड सारखे दिसत आहे. जे दहा हजार वर्षे जुन्या दगडांनी बनलेले आहे. याचा अर्थ ही अज्ञात मानवी संस्कृती तेव्हाही होती, जेव्हा गेल्या हिमयुगानंतर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली नव्हती. म्हणजेच हे इजिप्तच्या पिरॅमिडसारखे (५००० वर्षे) एवढेच काय पाषाण युगाच्याही (६००० वर्षे) आधी ही मानवी संस्कृती अस्तित्वात होती.