24.9 C
Latur
Thursday, March 13, 2025
Homeमहाराष्ट्रसमृद्धी महामार्गावर अपघात; एक ठार

समृद्धी महामार्गावर अपघात; एक ठार

बुलडाणा : समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. हा अपघात डोणगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चॅनल क्रमांक २६८ जवळ झाला.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अब्दुल करीम अब्दुल कलीम (वय २५, उत्तर प्रदेश) यांनी त्यांचे वाहन समृद्धी महामार्गावरील भारत पेट्रोलपंपाजवळ इंडिकेटर लावून थांबवले होते. याच वेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली.

या अपघातात पिकअप वाहनाचा चालक अमन धुलचंद सैनी (रा. भोपाल) जखमी झाला, तर त्याच्यासोबत असलेला प्रवासी रवि रामकीसन अहीरवाल (रा. इस्लामनगर, बेरसिया रोडगंज, भोपाल) याचा मृत्यू झाला. अपघातामुळे ट्रकचेही मोठे नुकसान झाले.

या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून डोणगाव पोलिस ठाण्यात पिकअप चालक अमन धुलचंद सैनी याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १०६(१), २८१, ३२४(४) बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

समृद्धी महामार्गाच्या डोणगाव परिसरात स्थानिक पेट्रोल पंप आणि हॉटेलांमुळे महामार्गाच्या कडेला ट्रक मोठ्या संख्येने थांबतात. परिणामी, महामार्गावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

या बाबीकडे महामार्ग पोलिस आणि स्थानिक पोलिस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. वेळेत योग्य उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठ्या दुर्घटनांना सामोरे जावे लागू शकते.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR