26.5 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्रसमृद्धी महामार्गावर भीषण अपघात; तीन ठार

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात; तीन ठार

नाशिक : प्रतिनिधी
समृद्धी महामार्गावर कार दुभाजकावर धडकून तीन जणांचा जागीच मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. शिर्डी येथून साईबाबांचे दर्शन घेऊन परतत असताना मंगळवारी सायंकाळी पिंपरी फाट्यावर हा अपघात झाला. अपघातातील मृत आणि जखमी नवी मुंबईजवळील खालापूर येथील रहिवासी आहेत. गीता रमेश अग्रवाल, निर्मय अनुज गोयल, अनुज रमेश गोयल, यांचा जागीच मृत्यू झाला.

तर रमेशचंद्र अग्रवाल, मीती अनुज गोयल आणि दिव्यांशी अनुज गोयल हे गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
कार दुभाजकावर धडकल्याने झाला भीषण अपघात : नवी मुंबई येथील खालापूर भागातील गोयल आणि अग्रवाल कुटुंब शिर्डी येथे स्विफ्ट कारमधून दर्शनासाठी गेले होते. शिर्डीहून परतत असताना नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्गावरील पिंपरी फाटा येथे भरधाव वेगातील कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले.

कार दुभाजकावर आदळून दुस-या मार्गिकेत जाऊन उलटली. या अपघातात गीता रमेश अग्रवाल (७२), निर्मय अनुज गोयल (१६), अनुज रमेश गोयल (५२, चालक), यांचा जागीच मृत्यू झाला. रमेशचंद्र अग्रवाल (८०), मीती अनुज गोयल (४५) आणि दिव्यांशी अनुज गोयल (२१) हे गंभीर जखमी झाले. मृत आणि जखमींना रुग्णवाहिकेतून घोटीजवळील एसएमबीटी या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातात कारचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. याबाबत इगतपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR