22.8 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्रसरकारकडून एक लाख कोटींची उधळपट्टी

सरकारकडून एक लाख कोटींची उधळपट्टी

डोंबिवली : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी (अजित पवार) काँग्रेसने अकराशेहून अधिक निर्णय घेतले. विकास कामांच्या नावाखाली एक लाख कोटींची उधळपट्टी केली असल्याचा आरोप उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार आणि नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनी गुरुवारी येथे केला.

डोंबिवलीतील मोठागाव खाडी किनारी ठाकरे गटाचे उमेदवार दीपेश म्हात्रे यांनी छठ पूजेचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमातील सहभागानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या. विकास कामांच्या नावाखाली महायुती सरकारने कोट्यवधीची उधळपट्टी केली. यामुळे या सरकारमधील नेत्यांचे उत्पन्न १०० ते ७०० टक्के वाढले आहे. हे घोटाळेबाज सरकार आहे. महाविकास आघाडीची सत्ता राज्यात आली की पहिले या घोटाळेबाजांवर कारवाई सुरू केली जाईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

भाजपवर त्यांनी कडाडून टीका केली. भाजप नेत्यांनी बटेंगे तो कटेंगे अशी घोषणाबाजी केली आहे. स्वार्थासाठी विरोधी पक्षनेते, पदाधिका-यांना फोडण्याचे काम ते करत आहेत. जनतेच्या अपेक्षांना त्यांनी पाने पुसली आहेत आणि राज्याची तिजोरी लुटण्याचे काम महायुती सरकारने केले आहे, असा आरोप खा. चतुर्वेदी यांनी केला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR