22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रसरकारच्या हातात आता अखेरची रात्र

सरकारच्या हातात आता अखेरची रात्र

जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासंदर्भात आपण सरकारकडे ९ मागण्या केलेल्या होत्या. त्या पूर्ण करण्याकरिता राज्य शासनाने आपल्याकडून १३ जुलै ही तारीख घेतली होती. त्यानुसार सरकारच्या हातात आजची अखेरची रात्र आहे. सरकारने हे प्रकरण गांभीर्याने घ्यावे नाही तर विधानसभेत २८८ उमेदवार पाडले जातील, असे आव्हान मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिले.

मराठा आरक्षणासाठी लढणारे नेते मनोज जरांगे पाटील यांनी मराठवाड्यात काढलेल्या शांतता फेरीचा समारोप शनिवारी छत्रपती संभाजीनगर शहरात झाला. शनिवारी रात्री ८ वाजता क्रांती चौकात जरांगे यांचे समारोपाचे भाषण झाले. बीडपाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्येही त्यांच्या सभेला तुफान गर्दी झाली होती.

आमच्याकडून घेतलेल्या तारखेनुसार सरकारच्या हातात आजची शेवटची रात्र आहे. छगन भुजबळ यांच्या नादी लागले तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे पक्ष सत्तेबाहेर जातील. त्यामुळे भुजबळ यांच्याकडे लक्ष न देता सरकारने आमच्या मागण्या मान्य कराव्यात अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाज २८८ उमेदवार पाडेन, असा गर्भित इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

…तर २० पासून पुन्हा उपोषण
राज्य सरकारने रात्रीत जो काही निर्णय घ्यायचा आहे तो घ्यावा अन्यथा २० जुलैपासून आपण पुन्हा उपोषणलाा बसणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी आज छ. संभाजीनगर येथे केली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाचे प्रतिनिधी द्यायचे की नाही, याचीही घोषणा केली जाईल, असेही ते म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR